Shocking revelations in death case of young man after 5 years four suspects arrested; मुंबईतील चौघांनी कोकणातील तरुणाला संपवलं, ५ वर्ष कोणालाच पत्ता नाही; पण दारुच्या नशेत एकाने तोंड उघडताच धक्कादायक उलगडा
Shocking revelations in death case of young man after 5 years four suspects arrested; मुंबईतील चौघांनी कोकणातील तरुणाला संपवलं, ५ वर्ष कोणालाच पत्ता नाही; पण दारुच्या नशेत एकाने तोंड उघडताच धक्कादायक उलगडा
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली फोंडाघाट येथे पाच वर्षांपूर्वी आढळलेल्या मृतदेह हा आकस्मिक मृत्यू नसून तो खून होता याचा उलगडा मुंबई येथील घाटकोपर पोलिसांच्या क्राइम ब्रँचने केला आहे. या खून प्रकरणी चार संशयित आरोपींच्या घाटकोपर पोलिसांनी मुसक्या आवळल्यानंतर त्यांना कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशपाक मुलाणी उर्फ निहाल (रा. सोलापूर) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणात मनोज नारायण भंडगे, सुरेंद्र चंद्रहास सोनवडेकर, अतिष भगवान मोरे, ऋतूराज शेट्टी हे चौघेजण संशयित आरोपी असून ते मुंबई परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती घाटकोपर क्राईम ब्रँचच्या पोलीस पथकाने दिली आहे.
याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार , कणकवली फोंडाघाट येथे दरीत कोसळून सुमारे पाच वर्षांपूर्वी एकाचा मृत्यू झाला होता. बाजूलाच दुचाकी देखील असल्याने अशपाक दुचाकीसह घाटात कोसळला असावा, अशा प्राथमिक निष्कर्षानुसार कणकवली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र नुकताच एक जण दारूच्या नशेत या मृत्यूबाबत काहीतरी बोलला आणि हीच बाब घाटकोपर पोलिसांपर्यंत पोहोचली. घाटकोपर क्राइम ब्रांचने या सगळ्या घटनेची गंभीर दखल घेत तपासाची चक्र वेगाने फिरवली. या चौघांनाही बुधवारी बोलावून घेतल्यानंतर पोलिसी हिसका दाखवत या खून प्रकरणातील चौघांनाही बोलते केले. या वेळेला अशपाक याचा खून हा आर्थिक देवाण-घेवाणीतून झाल्याची माहिती समोर आली.
संशयितांनी अशपाक याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे एका हॉटेलमध्ये बोलावून घेतले. यावेळी त्याला जबर मारहाण करण्यात आली आणि यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी कोणालाही संशय येऊ नये यासाठी अशपाक याचा मृतदेह व त्याच्या ताब्यातील दुचाकी फोंडाघाट येथे दरीत टाकली व तेथून फरार झाल्याची माहिती घाटकोपर क्राईम ब्रँचच्या तपासात समोर आली आहे.
घाटकोपर क्राइम ब्रँचची मोठी कामगिरी
या कारवाईत पोलीस आयुक्त देवन भारती, सह पोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अप्पर पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उप आयुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे, वैशाली सरवदे, धनाजी साठे, महेश शेलार, स्वप्नील काळे, पोलीस उपनिरीक्षक नामदेव परबळकर, अरूण सावंत या पोलीस पथकाने सहभाग घेतला. याप्रकरणी आता अधिक तपास कणकवली व घाटकोपर पोलीस करत आहेत.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा