Headlines

Shivani Sonar : अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी ‘या’ क्षेत्रात काम करायची झी मराठीची नायिका, स्वतःच केला खुलासा


Zee Marathi Actress Shivani Sonar : ‘तारिणी’ फेम शिवानी सोनार अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी दुसऱ्या क्षेत्रात काम करत होती. याबद्दल तिनं एका मुलाखतीत सांगितलंय.

Shivani Sonar Worked As Makeup Artist
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – मराठी इंडस्ट्रीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी इंडस्ट्रीत येण्यापूर्वी वेगळ्या क्षेत्रात काम केलं आहे. मराठी अभिनेत्री शिवानी सोनारही अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी मेकअप आर्टिस्ट होती. याबद्दल तिनं नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं आहे.

शिवानी सोनार मुलाखतीदरम्यान म्हणाली की, ‘माझी आई ब्यूटीशियन आहे आणि ती मेहंदी आर्टिस्ट आहे. ती नवरीला लग्नात मेहंदी वगैरे काढायला जायची. तर, दहावी झाल्यावर मी सुद्धा आईबरोबर जायचे. दहावीच्या सुट्ट्यांमध्ये काय करायचं, तर आईनं मला मेहंदी शिकवून ठेवली होती. मलाही मेहंदी काढायला आवडू लागलं. त्यात माझ्या आईला मेकअप शिकायची प्रचंड इच्छा होती. पण, माझा भाऊ लहान असल्यानं आईला वेळ मिळत नव्हता. त्यामुळे आई म्हणाली, १० दिवसांचं मेकअप वर्कशॉप आहे, माझ्याऐवजी तू कर. खरंतर, माझा आणि मेकअपचा दूरवर काहीच संबंध नव्हता. मी कधी मेकअप वगैरे शिकेन असंही मला वाटलं नव्हतं. आता वर्कशॉपसाठी पैसे भरलेत, आईला जाता येणार नाही, त्यापेक्षा मग मी जाते. म्हणून मी त्या मेकअप वर्कशॉपला गेले आणि मलाही ते सगळं आवडू लागलं.’

Onkar Raut Celebrity Corner : टाइमपास ते महाराष्ट्राची हास्यजत्रा…ओंकार राऊतसोबत खास गप्पा

शिवानी पुढे म्हणाली की, ‘मी माझं मेकअपचं पहिलं वर्कशॉप कविता कोपरकर ताईकडे केलंय. ती पुण्यातील खूप मोठी मेकअप आर्टिस्ट आहे. प्रथा हा साड्यांचा ब्रँडही तिचाच आहे. तर, कविता ताईमुळे मला मेकअपबद्दल बऱ्याच गोष्टी समजल्या आणि आवड निर्माण झाली. हळुहळू मग मी ब्रायडल मेकअप करू लागले. टप्याटप्यानं माझा प्रवास सुरू झाला. चार महिन्यात या सगळ्या गोष्टी घडल्या.’

Maharashtra TimesVijay Nikam : ‘मी आर्थिकदृष्ट्या शून्यावर आलो’, सिनेमासाठी विकली जमापुंजी, डोक्यावर लाखोंचं कर्ज; मराठी अभिनेत्यानं सांगितला कठीण काळ

अभिनय क्षेत्रात काम करण्याचा निर्णय

‘२०१७ मध्ये मी मेकअप शिकले आणि जवळपास २०२१ पर्यंत मी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केलंय. ‘राजा राणीची गं जोडी’ ही मालिका सुरू असताना पहिलं एक वर्ष मी मेकअपचं कामंही करत होते. या मालिकेदरम्यान मग मी ठरवलं, आता आपल्याला अभिनय क्षेत्रातच काम करायचं आहे.’

Maharashtra TimesKangana Sharma : ‘माझ्या बहिणीला सासरच्यांनी देहविक्री व्यवसायात ढकललेलं’, अभिनेत्रीनं सांगितला प्रसंग; म्हणाली, ‘वडिलांनी तिला 1 रुपयात मिठाईवाल्याला विकलं’
‘अभिनय क्षेत्रातही मेकअप आर्टिस्ट असल्याचा खूप फायदा झाला. मी अनेकदा स्वत:चा मेकअप मी स्वत: करते. एखाद्या पुरस्कार सोहळ्याला वगैरे जायचं असेल, कोणत्या कार्यक्रमाला जायचं असेल तर प्रेझेंटेबल कसं राहावं, या सगळ्या गोष्टी मला मेकअप शिकल्यामुळे समजल्या.’ असं शिवानी शेवटी म्हणाली. ‘सर्व काही’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवानी बोलत होती.

दरम्यान, शिवानी सोनारच्या कामाबद्दल सांगायचं तर सध्या ती झी मराठी वाहिनीवरील ‘तारिणी’ या मालिकेत काम करत असून अभिनेत्रीच्या तारिणीच्या भूमिकेचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा