सामान्य एफडी Vs बल्क एफडी
एका विशिष्ट ठराविक काळासाठी तसेच या काळात व्याज मिळवण्यासाठी बँकेत जमा केलेली रक्कम म्हणजे एफडी. प्रत्येक बँकेचे एफडी व्याजदर वेगवेगळे आहेत. आरबीआईने बँकेला त्यांचा स्वतंत्र व्याजदर ठरवण्याची मुभा दिली आहे. 3 कोटी रक्कमेच्या आत असणारी एफडी सामान्य प्रकारात मोडते तर 3 कोटी किंवा त्याहून जास्त रक्कमेची एफडी बल्क प्रकारात मोडते.
आरबीआईचे नवे नियम कोणते?
- प्रत्येक बँकेला त्यांचे एफडी Rates बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर दाखवावे लागणार आहेत.
- बल्क एफडीसाठीचे दर बँकेने दररोज दहा वाजेपर्यंत अपडेट करणे बंधनकारक आहे.
- आता बँकेला प्रत्येक शाखेत एकच व्याजदर ठेवणे बंधनकारक आहे. जर बँक सारखीच आहे, करण्यात आलेली एफडी सारखीच आहे तसेच एफडी घेण्याचा दिवसही सारखाच असेल तर लागू दरही सारखाच असेल.
- बल्क एफडीसाठी दर बदलू शकतो.
सामान्य एफडीसाठी नियम किती फायद्याचे?
सामान्य एफडीमध्ये गुंतवणूक करू पाहणाऱ्या मंडळींना नव्या नियमांमुळे एफडी घेण्यापूर्वी बँकेचे दर तपासता येणार आहेत. तसेच इतर बँकांशी तुलना करता येणार आहे.
बल्क एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींना या नियमांचा फायदा काय?
जर एखादी कंपनी 3 कोटींच्या वर एफडीत गुंतवणूक करत असेल तर त्यांना दररोज सकाळी 10 वाजेपर्यंत बँकेच्या दरासंबंधित अपडेट मिळणार आहे. आधीच रेट माहिती पडल्यामुळे गुंतवणूकदारांची निर्णयक्षमता सुधारणार आहे. तसेच पारदर्शकता वाढेल.
एकंदरीत, नव्या नियमांनुसार बँकेला दर अधिक स्पष्टपणे दाखवावे लागणार आहे. तसेच गुंतवणूक करू पाहणाऱ्या मंडळींना बँकेचे दर तपासणे अधिक सोपे होईल, जेणेकरून विविध बँकांच्या चालू एफडी दरांचा अभ्यास करून त्यांना त्यांच्यासाठी योग्य असणाऱ्या एफडीमध्ये गुंतवणूक करता येईल.
डॉलर घसरला, भारतीय चलनाला बळकटी, शेअर मार्केटही सुसाट; आता पुढे काय?बँक एफडीचा व्याजदर कसा ठरवतो?
भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील बँकांना एफडीचा व्याजदर स्वतः ठरवण्याची मुभा दिली आहे. एखादी बँक व्याजदर ठरवताना विविध घटक लक्षात घेते. RBI रेपो रेट, बँकेला असणारी पैशांची गरज, एफडीची रक्कम आणि कालावधी या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन एफडीचा व्याजदर ठरवला जातो. जर बँकेला पैशांची गरज असेल तर गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी एफडीवरील व्याजदर वाढवण्यात येतो. जर बँकेकडे मुबलक पैसे असतील तर पैशांची फार गरज नसल्याने बँक व्याजदर कमी ठेवणे पसंत करते.

