Headlines

Shivaji Market News | शिवाजी मार्केटचा भाग अचानक रस्त्यावर कोसळला; गाळेधारकांचा संताप


कोल्हापुर – शिवाजी चौकातून पापाच्या तिकटीकडे जाणाऱ्या वर्दळीच्या मार्गांवर छत्रपती शिवाजी मार्केटच्या तिसऱ्या मजल्याखालील स्लॅबचा मोठा भाग गुरुवारी दुपारी अचानक रस्त्यावर कोसळला हा भाग वजनदार असल्याने मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती मात्र सुदैवाने ज्या गाळ्यासमोर हा भाग कोसळला, त्या ठिकाणी नागरिक नसल्याने जीवितहानी टळली. या घटनेने संतप्त झालेल्या गाळेधारकांनी थेट रस्त्यावर उत्तरत आंदोलन सुरू केले. त्यामुळे शिवाजी चौकातून पापाची तिकडे जाणारा मार्ग दुपारपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला.

महानगरपालिकेने सुमारे ३० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी मार्केटनी इमारत उभारली आहे. या मार्केटमध्ये १४४ गाळे व महानगरपालिकेनी विविध विभागानी कार्यालये आहेत इमारतीची अवस्था दिवसेंदिवस खराब होत असून, दुरुस्तीची मागणी गाळेधारकांकडून सातत्याने केली जात जात आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वीही पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयाकडील बाजुच्या फरशीचा भाग कोसळला होता ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी नळ बसविण्यात आला आहे, त्याच ठिकाणी हीत्याच ठिकाणी ही फरशी पडली होती. यावेळी देखील येथील व्यापारयांनी इमरातीची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली होती. परंतू नेहमीप्रमाणे या मागणीकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप गाळेधारकांनी केला.

छत्रपती शिवाजी मार्केट इमारतीची फरशी पडण्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी पुन्हा तिसऱ्या मजल्याखालील भाग कोसळला. यामुळे गाळेधारकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेने सर्व गाळेधारक एकत्र आले आणि त्यांनी रस्त्यावर ठिय्या देत आंदोलन सुरू केले. इमारतीची तातडीने दुरुस्ती करावी, तसेच भविष्यात मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी धोकादायक भाग हटवावा, अशी मागणी त्यांनी केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी संबंधित मार्ग वाहतुकीसाठी बंद केला. त्यानंतर महापालिकेच्या शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयाच्च्या सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाने आणि उपशहर अभियंता सुरेश पाटील यांनीही भेट दिली. यावेळी संतप्त गाळेधारकांनी त्यांनाा घेराव घालत धारेवर धरला.

आंदोलनात माजी नगरसेवक भूपाल शेटे, विजय करजगार, नितीन बामणे, शिवाजी सातपुते, अभिजित सातपुते, मनोज गवळी, मारुती गवळी, महेश रुकडीकर, विनायक राजमाने, पंढरीनाथ कदम, अनिल संकपाळ आदी सहभागी झाले होते.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत