Headlines

Pension commutation Restoration Rule ; 8th Pay Commission : 15 वर्षांचा कालावधी कमी करा, कर्मचारी संघटनांचा आणखी एक प्रस्ताव, मान्य झाल्यास पेन्शनमध्ये काय फायदा होणार?


देशातील कर्मचारी तसेच पेन्शनर वर्गाने आठव्या वेतन आयोगाकडून अनेक अपेक्षा वर्तवल्या आहेत. नुकतेच देशातील विविध पेन्शन संघटनांनी त्यांचा मागण्या आठव्या वेतन आयोगासमोर सादर केल्या आहेत. आधीच्या नियमांनुसार, सेवानिवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्याने कम्युट केलेली पेन्शन पुन्हा मिळवण्यासाठी 15 वर्षांची मुदत दिली जाते. देशातील पेन्शनर तसेच कर्मचारी संघटनांनी याच नियमात बदल करण्याची मागणी केली आहे.

देशातील काही मुख्य पेन्शनर तसेच कर्मचारी संघटनांची मागणी आहे की कम्युट पेन्शन पुन्हा मिळवण्यासाठी देण्यात येणाऱ्या 15 वर्षांच्या मुदतीत घट करण्यात यावी. वेगवेगळ्या संघटनांनी वेगवेगळ्या मुदतीची मागणी केली आहे. नॅशनल काऊन्सल ऑफ जेसीएमने मुदत 11 वर्षे करण्याची मागणी केली आहे. एआईडीईएफ, एफएनपीओ तसेच एफएनपीओ या संघटनांनीही सारखीच मागणी केली आहे.तर इंडियन रेल्वेज टेक्निकल सुपरवाईजर्स असोसिएशनने मुदत किमान 12 वर्षे करण्याची मागणी केली आहे. ऑल इंडिया न्यू पेन्शन स्कीम एम्प्लॉईज फेडरेशनचे म्हणने आहे की 15 वर्षांची मुदत कमी करून 10 वर्षांची करण्यात यावी.

1981 च्या आर्थिक परिस्थिति तसेच नियमांवरून निश्चित करण्यात आलेली 15 वर्षांची मुदत आताच्या काळातील आर्थिक परिस्थितीशी सुसंगत आहे का? असा सवाल या संघटनांनी केला आहे. त्याकाळी असणारे व्याजदर, आर्थिक परिस्थिति तसेच लोकांचं संपूर्ण जीवन आणि आर्थिक अडचणी आतापेक्षा फार वेगळे असल्याचा दावा या संघटनांकडून करण्यात आला आहे.त्यामुळे मुदत कमी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

जर कर्मचाऱ्याने सेवानिवृत्तीनंतर पेन्शनमधली एकरकमी रक्कम काढून घेतली आणि पुढच्या 11 वर्षांमध्ये ती रक्कम पूर्ण फिटली जात असेल तर आणखीन 4 वर्षांचा कार्यकाल हा पेन्शनर्सवर आर्थिक भार आहे, असा आक्षेप या संघटनांनी नोंदवला आहे.

Maharashtra TimesHighest Paying Job: इंटर्न्सना 30-50 लाखांचा पगार, खास स्किलमुळे फ्रेशर्सना मिळतेय बंपर पगाराची ऑफर; पाहा गलेलठ्ठ पगार देणाऱ्या या कंपन्या कोणत्या?उदाहरणाने समजून घ्या संघटनांची मागणी.,

जर एखाद्या पेन्शनरचे बेसिक पेन्शन 35,000 रुपये प्रति महिना आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शनरने प्रत्येक महिन्याला मिळणाऱ्या पेन्शनचा 40% भाग फक्त 11 वर्षांसाठी काढून घेतला. तर पुढील 11 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याच्या पेन्शन मधून 14,000 रुपये कापण्यात येतील आणि पेन्शनरला दरमाह फक्त 21,000 रुपये प्राप्त होतील. तर पुढील 11 वर्षांसाठी दर महिन्याला कापण्यात आलेले 14,000 रुपये सेवानिवृत्त झालेल्या पेन्शनरला आधीच lumpsum रक्कमेत मिळेल. म्हणजेच एकूण 18.48 लाखांची पेन्शन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या खात्यात आधीच जमा होईल. 11 वर्षांची मुदत पूर्ण झाल्यानंतर कर्मचाऱ्याला पुन्हा 35,000 पेन्शन दरमाह मिळण्यास सुरुवात होईल.

दिवेश चव्हाण

लेखकाबद्दलदिवेश चव्हाणदिवेश दिनेश चव्हाण हे मराठी पत्रकार असून ते सध्या महाराष्ट्र टाइम्स येथे कंटेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. ऑगस्ट 2026 पासून ते महाराष्ट्र टाइम्स येथे अर्थ, पर्सनल फायनान्स आणि देश-विदेशातील बातम्यांसंबंधित लेखन करत आहेत. शेअर बाजारातील घडामोडी, बँकिंग, नवे आर्थिक धोरण आणि तांत्रिक नियम अतिशय सोप्या भाषेत आणि सविस्तर पद्धतीने समजावून सांगणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

यापूर्वी ते नवराष्ट्र या मराठी वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून काम करत होते. या काळात त्यांनी अर्थ, व्यवसाय, करिअर आणि नोकरीसह विविध क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन केले आहे. यासोबतच काल्पनिक कथा लेखन आणि एखाद्या कथेचे स्वारस्यपूर्ण विश्लेषण करण्यातही ते पटाईत आहेत.

त्यांचे शिक्षण ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयात झाले. याच ठिकाणी त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्याकडे मास्टर ऑफ आर्ट्स इन मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन ही पदव्युत्तर पदवी आहे. विविध विषयांवर अचूक आणि विश्वासार्ह बातम्या पुरवणे हा त्यांच्या लेखन, पत्रकारितेच्या माध्यमातून वाचकांना दर्जेदार माहिती देऊन त्यांना जागतिक घडामोडींविषयी जागरुक ठेवणे हा त्यांचा हेतु आहे.
जोशी बेडेकर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना महाविद्यालयीन वार्षिक अंक Rta मध्ये इंग्रजी रिपोर्टींग विभागाचे हेड म्हणून त्यांनी कारोभार सांभाळला आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत