Shirpur Crime woman dies by poisoning along with two children husband detained multiple marriages case; विवाहितेने दोन चिमुकल्यांसह विष प्राशन केलं की दिलं? 2 जणांचा मृत्यू, 7 लग्न करणारा पती ताब्यात; शिरपूरमधील घटना
Shirpur Crime woman dies by poisoning along with two children husband detained multiple marriages case; विवाहितेने दोन चिमुकल्यांसह विष प्राशन केलं की दिलं? 2 जणांचा मृत्यू, 7 लग्न करणारा पती ताब्यात; शिरपूरमधील घटना
धुळे जिल्ह्यातील शिरपूरमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. आरती पावरा या विवाहितेने दोन मुलांसह विष प्राशन केले, ज्यामध्ये…..
शिरपूर तालुक्यातील आंबे ग्रामपंचायत हद्दीत आई आणि मुलाचा विष प्राशन केल्याने मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अजय गर्दे, धुळे: धुळ्यामधील एका प्रकरणाने सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे. या घटनेमध्ये आईने पोटच्या दोन चिमुकल्यांना विष दिल्याचे सांगितले जाते आहे. पण कोणतीही आई असं का करेन हा एक मोठा प्रश्न आहे. स्वतःच्या जीवापेक्षा जास्त मुलांना जीव लावणारी आई असते. आई ही अशी माऊली असते जी संकटकाळात स्वतः जीवानिशी जायला तयार असते पण स्वत:च्या मुलांवर कोणतेच सावट येऊ देत नाही. त्यामुळे आता या प्रकरणी या आईने विष दिले की तिच्यासह तिच्या मुलांनाही कोणाकडून तरी विष दिले गेले आहे, हा संशय नागरिकांमधून व्यक्त होतो आहे.
नेमकी घटना काय?
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील आंबे ग्रामपंचायत हद्दीतील भिलटदेव पाडा येथे मन हेलावून टाकणारी एक दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. येथील आरती संजय पावरा (वय ३०) या विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह विषारी औषध प्राशन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेत विवाहिता आरती आणि तिचा तीन वर्षीय मुलगा चिराग यांचा मृत्यू झाला आहे, तर पाच वर्षीय मोठा मुलगा रिहांश याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. रिहांश सध्या मृत्यूशी झुंज देत असून, त्याच्यावर धुळे येथील जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. एकाच वेळी आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सामूहिक आत्महत्या की हत्या?
दरम्यान, ही घटना उघडकीस आल्यानंतर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. प्राथमिक तपासात ही घटना संशयास्पद वाटत असून, ही सामूहिक आत्महत्या आहे की हत्या? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मयत विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी संबंधित पतीची ही सातवी पत्नी असून यापूर्वी तिघा पत्नींची देखील अशाच प्रकारे हत्या करण्यात आली असल्याचा पतीवर गंभीर आरोप केला आहे.
या घटनेची दखल घेत शिरपूर पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला असून, संशयित पतीला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस आता शवविच्छेदन अहवाल आणि नातेवाईकांच्या जबाबाच्या आधारे या मृत्यूचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करत आहेत.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा