Headlines

Shinde Vs Thackeray | नाशिकमध्ये खड्ड्यांवरून आदित्य ठाकरे मैदानात, शिंदेंची दुखरी नस पकडली Nashik – aditya thackeray targets eknath shinde over nashik potholes road condition


Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#nashik #aadityathackeray #eknathshindeनाशिक शहरातील रस्त्यांवर निर्माण झालेले खड्डे हा स्थानिक नागरिक आणि प्रवाशांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. नाशिक खड्ड्यांमुळे मृत्यूचा सापळा बनलं आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आतापर्यंत तब्बल ७ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. सततचा पाऊस आणि निकृष्ट दर्जाचे काम यामुळे नाशिक शहरातील मुख्य रस्ते, चौक आणि महामार्गांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याची विकासकामे आणि स्मार्ट सिटी प्रोजेक्ट अंतर्गत सुरू असलेल्या अविरत रस्त्यांच्या खोदकामामुळे संपूर्ण शहराची दैना झाली आहे. रस्ते दुरुस्ती आणि खड्डे बुजविण्याचे काम वेळेत व दर्जेदार पद्धतीने होत नसल्याने नागरिकांमधून असंतोष व्यक्त केला जातोय. नाशिक महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार आहे. त्यामुळे या दुर्घटनेवरून विरोधकांनी थेट सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून महापालिकेत आंदोलन करण्यात आलं तर आदित्य ठाकरे यांनी पाहणी दौरा केला तर १७ ऑगस्टला मोर्चाही काढण्यात येणार आहे. आदित्य ठाकरे यांनी यावेळी पाहणी केल्यानंतर शिंदेंवरही टीकास्त्र डागलंय. यामुळे नाशिकच्या खड्ड्यांवरून ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदेंची कशी कोंडी करतंय तेच या व्हिडिओतून समजून घेऊ….



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत