SEBI Short Selling Rule: तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करत असाल तर भविष्यात तुमच्या व्यवहाराची पद्धत पूर्णपणे बदलणार आहे. देशांतर्गत इक्विटी बाजार नियामक, सेबी, शेअर मार्केटमध्ये एक लक्षणीय बदल करण्याच्या तयारीत आहे ज्यामुळे शॉर्ट सेलिंग पूर्वीपेक्षा अधिक सोपी होऊ शकेल.

शॉर्ट सेलिंगबद्दल सेबीचा प्लॅन काय
या प्रकरणाशी संबंधित दोन व्यक्तींच्या माहितीनुसार सेबीचा उद्देश अधिक जोखमीच्या डेरिव्हेटिव्ह बाजाराऐवजी कॅश इक्विटी बाजार मजबूत करणे आणि गुंतवणूकदारांना कॅश बाजाराकडे आकर्षित करण्याचा आहे. तसेच आज, NSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य 5 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त झाले आहे.
Saudi Oil Price Cut: तेलाच्या खेळात सौदी अरेबियाची बाजी! भारताच्या मित्राने वाढत्या किमतीतवर केला 26 वर्षांतील सर्वात मोठा ‘स्ट्राईक’
पण डेरिव्हेटिव्ह्ज बाजार त्याहूनही झपाट्याने वाढला असून आजच्या काळात डेरिव्हेटिव्ह्जमध्ये गुंतवलेली रक्कम कॅश मार्केटपेक्षा सुमारे तीन पटीने जास्त आहे आणि डेरिव्हेटिव्ह्ज काँट्रॅक्टसचे एकूण मूल्य कॅश मार्केटच्या सुमारे 500 पटींपर्यंत पोहोचले आहे.
भारतीय बाजारात गेल्या काही वर्षांत डेरिव्हेटिव्ह्ज ट्रेडिंगमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग वाढली आहे पण, विशेषतः किरकोळ गुंतवणूकदारांसाठी अत्यंत जोखमीचे मानले जाते. त्याचप्रमाणे भारतीय शेअर बाजारातील घोटाळ्यांनंतर कॅश इक्विटी मार्केटसाठी अनेक कठोर नियम लागू केले गेले असून 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला नियम अधिक कडक केले गेलेले. मग 2017 ते 2020 दरम्यान बाजारातील पारदर्शकता राखणे आणि गुंतवणूकदारांचे हित अधिक चांगल्या प्रकारे जपण्यासाठी नियम आणखी कडक केले गेले.
Stock Crash: कधी रॉकेटपेक्षाही सुस्साट, आता कोणी ढुंकूनही पाहीना; अंबानींच्या शेअरमुळे गुंतवणूकदारांचा खिशाला चाट
सध्या NSE वर अंदाजे 2600 कंपन्या सूचिबद्ध असून भारताच्या कॅश इक्विटी मार्केटमध्ये अंदाजे 95% वाटा आहे. मात्र यापैकी केवळ 176 स्टॉक्समध्ये SLB सुविधा मिळते म्हणजे, गुंतवणूकदार केवळ या निवडक स्टॉक्समध्येच शॉर्ट सेलिंग करू शकतात. अशाप्रकारे, सेबी ही संख्या जवळपास दुप्पट करू पाहत आहे जेणेकरून अधिक लिक्विड स्टॉक्सना (ज्यांचा दैनंदिन ट्रेडिंग व्हॉल्यूम जास्त असतो) या सुविधेच्या कक्षेत आणता येईल.
Oil Prices Crash: होर्मुज खुलताच उकळत्या Crude बाबत भारताला मोठा दिलासा… रशिया, इराणसह 22 देशांकडून तेल उत्पादनात वाढ
कोणकोणते शेअर्स पात्र ठरू शकतात?
लक्षात घ्या की प्रत्येक शेअर या सुविधेसाठी पात्र ठरत नाही, सेबीच्या नियमानुसार पात्रता ठरवली जाते. उदाहरणार्थ, स्टॉकचा दररोजचा ट्रेडिंग व्हॉल्यूम चांगला असला पाहिजे आणि डेरिव्हेटिव्ह्ज ट्रेडिंगसाठी देखील योग्य असला पाहिजे. सध्या मागील सहा महिन्यांत स्टॉकची सरासरी मासिक उलाढाल किमान 100 कोटी रुपये असणे आवश्यक आहे. तसेच, संपूर्ण बाजारात स्टॉकचे डेरिव्हेटिव्ह्ज एक्सपोजर किमान 100 कोटी रुपये असले पाहिजे ज्यामध्ये सेबी बदल करून शिथिलता आणण्याचा प्रयत्न करत आहे.
(Disclaimer : वरील तपशील केवळ माहितीसाठी आहे, गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते, त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या विश्वासू व्यक्तीचा सल्ला घ्या. तुमच्या नफा किंवा तोट्यास लेखक किंवा महाराष्ट्र टाइम्स व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही.)

