राज्य द्राक्ष बागायदार संघाच्या वतीने तीन दिवसीय द्राक्ष परिसंवाद आणि ६६व्या वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, आमदार सुनील कर्जतकर, माजी आमदार कल्याणराव पाटील, ऑल इंडिया ग्रेप ग्रोअर्स असोसिएशनचे अध्यक्ष सोपान कांचन, उपाध्यक्ष भीससेन कोकरे, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डाॅ. के. व्ही. प्रसाद, राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, उपाध्यक्ष मारुती चव्हाण आदी उपस्थित होते.
Pune News : सुट्टी काढली, पत्रिकाही छापल्या; पुण्यातील महिला पोलिसांचा समलिंगी विवाह रद्द, अचानक लागलेल्या ब्रेकमागील कारणांची चर्चा‘शेती आर्थिकदृष्ट्या अडचणीची होत असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे केंद्र आणि राज्य सरकारने गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांना आज तीन लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज मिळत आहे. ही मर्यादा सहा लाखांपर्यंत करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी उद्योगपतींच्या व्यवसाय कर्जाची पुनर्रचना करून त्यांचे व्याज कमी केले. त्यांचे हप्तेही वाढविले. उद्योगपतींसाठी होणाऱ्या निर्णयाप्रमाणेच काळ्या आईची सेवा करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांनाही कर्जामध्ये सवलती दिली जावी,’ असे पवार यांनी सांगितले.
‘एक ते दोन टक्के लोकांसाठी हजारो काेटी रुपयांच्या योजना आणल्या जातात. मात्र, ६० टक्के असलेल्या शेतकऱ्यांसाठी योजना आणाव्या लागतील,’ अशी मागणी माजी कृषिमंत्री कोकाटे यांनी या वेळी केली.
दरम्यान, या परिषदेत हवामान बदल, दर्जेदार उत्पादन, निर्यातवाढ, बाजारपेठेतील संधी आणि द्राक्ष उत्पादकांसमोरील आव्हाने यावर चर्चा होणार आहे.
Pune Accident : PhD करण्याचं स्वप्न अधुरं, सिंहगड रोडवर PMP बसमधून उतरताना घसरली, स्कूल बसने चिरडलं, 25 वर्षीय तरुणीचा चटका लावणारा अंत‘सरकार अपेक्षित काम करीत नाही’
‘राज्य सरकारने समृद्धी महामार्गासाठी ७५ हजार कोटी रुपये खर्च केले. शक्तिपीठ महामार्गासाठी एक लाख कोटींची घोषणा केली. देशातील ५५ ते ६० टक्के वर्ग हा शेतीवर अवलंबून आहे. मात्र या ६० टक्के लोकांसाठी सरकार अपेक्षित काम करत नाही. त्यामुळे शेतकरी शेतीमधून बाहेर पडण्याचा विचार करीत आहेत,’ अशी टीका माणिकराव कोकाटे यांनी केली. ‘जेन-झी’प्रमाणे शेतकरी रस्त्यावर उतरल्यास राजकारण करणेही अडचणीचे ठरले,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.
देश स्वतंत्र झाला; तेव्हा देशातील आटक्के लोक शेती करीत होते. त्या वेळी शेतजमीन ३५ टक्क्यांच्या आसपास होती. महामार्ग, रेल्वे आणि विविध प्रकल्पांमुळे शेतीचे क्षेत्र कमी होत आहे. मात्र, त्यावर अवलंबून असणाऱ्या वर्गाची संख्या वाढत आहे, ही बाब चिंता करण्यासारखी आहे. -शरद पवार

