Headlines

senior congress leader diwakar game has been arrested in pocso case ; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याला ‘पोक्सो’त अटक; जागतिक महिला दिनीच घटना उघड


NCP Leader Arrested: राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला ‘पोक्सो’ गुन्हाखाली अटक करण्यात आली आहे. जागतिक महिला दिनीच घटना उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

diwakar game
दिवाकर गमे(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, वर्धा : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. दिवाकर गमे यांना अल्पवयीन मुलीकडे लैंगिक सुखाची मागणी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोक्सोअंतर्गत गमे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. तीन वर्षांपासूनच्या त्रासाला कंटाळून पीडित युवतीने पुलगाव पोलिसांत तक्रार दाखल केली. या आधारावर महिलादिनी; रविवारी ही कारवाई झाली.

पोलिस तक्रारीनुसार, पीडित मुलगी २०२२मध्ये १७ वर्षांची असताना गमे यांनी तिला नोकरीचे आमिष दाखविले. यानंतर सातत्याने त लैंगिक सुखाची मागणी करू लागले. गमे हे युवतीच्या कुटुंबीयांना परिचित असल्याने बदनामीच्या भीतीपोटी ती गप्प राहिली. तीन दिवसांपूर्वी त्यांनी पीडितेला अश्लील फोटो आणि व्हिडीओ पाठवून त्रास दिला. सततच्या या त्रासाला कंटाळून युवतीने पुलगाव पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पुलगाव पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत ७ मार्चच्या सायंकाळी गमे यांना अटक केली. पोलिसांनी त्यांचा मोबाइलही जप्त केला आहे. यातून आणखी काही धक्कादायक पुरावे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Maharashtra TimesUPSC Success Story : ‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा’, 23 व्या वर्षात जळगावच्या आकाशची गगनाला गवसणी
गमे हे ‘महाज्योती’ या संस्थेत काही वर्षांपूर्वी संचालक म्हणून कार्यरत होते. ओबीसी प्रश्नांच्या अनुषंगाने सातत्याने आंदोलनेही करीत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका बड्या मंत्र्यांचे निकटवर्तीय आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी करीत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Maharashtra TimesBacchu Kadu: ठोस निर्णयाशिवाय माघार नाही! बच्चू कडूंचा सरकारला थेट इशारा, चिखलदऱ्यात आज तांडव आंदोलन, काय आहेत मागण्या?
पक्ष श्रेष्ठींच्या भूमिकेकडे लक्ष
प्रा. दिवाकर गमे यांना ‘पोक्सो’च्या गुन्ह्यात अटक करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेमकी काय कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे. आपल्या आंदोलनांच्या माध्यमातून ओबीसी चळवळीत गमे यांनी आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा