Headlines

Section 54 Terms And Conditions ; जुनं घर विकून नवं घर घेत आहात? आधी Section 54 बद्दल जाणून घ्या, अटी कराल पूर्ण तरच मिळेल कर सवलत


देशात अनेक गुंतवणूकदार प्रॉपर्टी इन्वेस्टमेंट मोठ्या प्रमाणात करत आहेत. जर तुम्हीही अशा गुंतवणुकीमध्ये रस ठेवत असाल तर ITAT ने जारी केलेला निर्णय नक्कीच तुमच्यासाठी महत्वाचा आहे. जर तुमच्याकडे एखादे जुने घर असेल, नवीन घराच्या बांधणीसाठी किंवा नवीन घर खरेदी करण्यासाठी तुम्ही त्या जुन्या घराची विक्री केली तर त्यातून होणाऱ्या नफ्यावरही टॅक्स आकारण्यात येतो. पण जर तो नफा पुन्हा नवे घर उभारण्यासाठी वापरण्यात आला तर आकाण्यात येणाऱ्या करात सवलत मिळते.

समजा, जर तुम्ही 2005 साली 6.48 लाखांनी घर खरेदी केले. तेच घर 8 वर्षांनी 53 लाखांना विकले तर होणारा नफा तुमचा कॅपिटल गेन ठरतो. सेक्शन 54 नुसार, जर तुम्ही तुमच्या मालकीचे घर विकले आणि त्यातून मिळणाऱ्या नफ्याच्या रक्कमेतून नवे घर बांधले तर नफ्यावर आकारण्यात येणाऱ्या करात सवलत मिळते. पण ही सवलत मिळवण्यासाठी तुम्हाला काही अटी शर्ती पात्र करणे आवश्यक आहे.

अटी-शर्ती जाणून घेण्यागोदर दिल्लीत घडलेली घटना जाणून घेऊयात.

राज कुमार यांनी 2005 साली दिल्लीतील पश्चिम विहार येथे फ्लॅट खरेदी केले होते. त्याकाळी त्यांनी 6.48 लाख रुपयांनी फ्लॅट खरेदी केले. पुढे 8 वर्षांनी त्यांनी फ्लॅट 53 लाखांनी विकून टाकला. या व्यवहारावर त्यांना फार मोठा कॅपिटल गेन मिळाला. पुढे सेक्शन 54 च्या माध्यमातून कर सवलत मिळवण्यासाठी अर्ज केल्यावर ते फेटाळण्यात आले. मुळात, राज कुमार यांनी दिल्लीतील तिलकनगर येथे 47.38 लाख रुपयांनी नवीन फ्लॅटही खरेदी केले होते म्हणजेच जुने घर विकून कमावलेला नफा हा नवे घर घेण्यासाठीच वापरण्यात आला होता, तरीही त्यांना कर सवलत नाकारण्यात आली. आयकर विभागाचे म्हणणे होते की राज कुमार यांनी आधी नवीन घर खरेदी केले आणि मग जुन्या घराची विक्री केली त्यामुळे त्यांना सेक्शन 54 नुसार कर सवलत देता येणार नाही.

पुढे राज कुमार यांनी NFAC ची वाट धरली, पण तिथेही त्यांचा प्रश्न सुटला नाही. अखेर त्यांनी मदतीसाठी दिल्ली येथील ITAT कडे अपील केली. तिथे सेक्शन 54 सहित सेक्शन 148 नोटिसच्या मुदतीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आला. मुळात, आयकर विभागाला एखाद्या कर दात्याने भरपाई केलेल्या करामध्ये काही गफलत आढळली तर एका ठराविक कार्यकाळाच्या आत करदात्याला नोटिस देण्याची अट असते. पण आयकर विभागाने राज कुमार यांना मुदत संपल्यानंतर सेक्शन 148 नोटिस पाठवली जी ग्राह्य धरली जात नाही.

Maharashtra Timesडॉलर घसरला, भारतीय चलनाला बळकटी, शेअर मार्केटही सुसाट; आता पुढे काय?मग ITAT चा निकाल काय?

ITAT म्हणते जुने घर विकण्याच्या आधी नवे घर घेतले तर या कारणामुळे सेक्शन 54 नुसार मिळणारी कर सवलत नाकरता येत नाही. जर जुने घर विकण्याच्या 1 वर्ष आधी किंवा 2 वर्षांच्या आत नव्या घराची खरेदी केली तर त्यावर सेक्शन 54 नुसार कर सवलत मिळते. दिल्लीची राज कुमार यांनी जुने घर विकण्याच्या 1 वर्ष आधी नव्या घराची खरेदी केली होती म्हणून ते सेक्शन 54 नुसार मिळणाऱ्या कर सवलतीला पात्र ठरतात.

दिवेश चव्हाण

लेखकाबद्दलदिवेश चव्हाणदिवेश दिनेश चव्हाण हे मराठी पत्रकार असून ते सध्या महाराष्ट्र टाइम्स येथे कंटेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. ऑगस्ट 2026 पासून ते महाराष्ट्र टाइम्स येथे अर्थ, पर्सनल फायनान्स आणि देश-विदेशातील बातम्यांसंबंधित लेखन करत आहेत. शेअर बाजारातील घडामोडी, बँकिंग, नवे आर्थिक धोरण आणि तांत्रिक नियम अतिशय सोप्या भाषेत आणि सविस्तर पद्धतीने समजावून सांगणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

यापूर्वी ते नवराष्ट्र या मराठी वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून काम करत होते. या काळात त्यांनी अर्थ, व्यवसाय, करिअर आणि नोकरीसह विविध क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन केले आहे. यासोबतच काल्पनिक कथा लेखन आणि एखाद्या कथेचे स्वारस्यपूर्ण विश्लेषण करण्यातही ते पटाईत आहेत.

त्यांचे शिक्षण ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयात झाले. याच ठिकाणी त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्याकडे मास्टर ऑफ आर्ट्स इन मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन ही पदव्युत्तर पदवी आहे. विविध विषयांवर अचूक आणि विश्वासार्ह बातम्या पुरवणे हा त्यांच्या लेखन, पत्रकारितेच्या माध्यमातून वाचकांना दर्जेदार माहिती देऊन त्यांना जागतिक घडामोडींविषयी जागरुक ठेवणे हा त्यांचा हेतु आहे.
जोशी बेडेकर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना महाविद्यालयीन वार्षिक अंक Rta मध्ये इंग्रजी रिपोर्टींग विभागाचे हेड म्हणून त्यांनी कारोभार सांभाळला आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत