Headlines

Anjali Arora : हे भगवान! ही आणि सीता? ‘कच्चा बदाम’ फेम टिकटॉकर माता सीतेच्या भूमिकेत, नेटकऱ्यांचा संताप


Anjali Arora Troll : रीलस्टार अंजली अरोरा तिच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत असून ती माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Anjali Arora Troll
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – ‘कच्चा बदाम गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अंजली अरोरा मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. ती ‘महाकाव्य श्री रामायण कथा – श्री राम की’ या चित्रपटात माता सीतेची भूमिका साकारणार आहे. मात्र, नेटकऱ्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

अलीकडेच, अंजली अरोरानं तिचा आगामी चित्रपट ‘महाकाव्य श्री रामायण कथा – श्री राम की’ चा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित केला असून हा सिनेमा चर्चेचा विषय ठरला आहे.

Maharashtra TimesTukaram Mundhe : ‘व्यक्ती कुणीही असो, कारवाई केली जाईल’, अजय, शाहरुख, टायगरच्या ‘विमल इलायची’ जाहिरातीबाबत तुकाराम मुंढेंची ठाम भूमिका

सीतेची भूमिका साकारल्यामुळे अंजली ट्रोल

यापूर्वी ‘लॉक-अप’मध्ये दिसलेली अंजली अरोरा, माता सीतेच्या भूमिकेत दिसल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा होत आहेत. काही नेटकऱ्यांनी अंजलीचं कौतुक केलं, तर काहींनी तिला ट्रोल केलं. नेटकऱ्यांनी अंजलीच्या चित्रपटाच्या टीझरची तुलना प्रभासच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाशी केली. अंजलीला सर्वाधिक ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे आणि लोक तिला माता सीतेच्या भूमिकेसाठी निवडल्याबद्दल कास्टिंग डायरेक्टरवर टीका करत आहेत.

Maharashtra TimesSuresh Oberoi : ‘मित्राच्या सांगण्यावरून मी भाजपमध्ये प्रवेश केलेला, राजकारणात खोटेपणा जाणवत होता’, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं वक्तव्य

टीझरवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

टीझरवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं की, ‘हे भगवान! ही आणि सीता?’, तर दुसऱ्याने लिहिलं, ‘हेच बघायचं बाकी राहिलेलं’, त्याचबरोबर ‘सीतेच्या भूमिकेसाठी चुकीची निवड’, ‘यापेक्षा जास्त सीतेचा अपमान कोणी केला नसेल’, ‘अंजलीला सीतेची भूमिका द्यायला नाही पाहिजे’, ‘सीतेचा का अपमान करताय?’, ‘बॉयकॉट’ अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय.

अंजली अरोराचा सिनेमा कधी प्रदर्शित होणार?

अंजली अरोराचा, ‘महाकाव्य श्री रामायण कथा – श्री राम की’ हा सिनेमा २५ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अभिषेक सिंग दिग्दर्शित या चित्रपटात देव शर्मा रामाच्या भूमिकेत, तर शील शर्मा लक्ष्मणाच्या भूमिकेत आहेत. रजनीश दुग्गल आणि निर्भय वाधवा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Maharashtra TimesVijay Nikam : ‘मी आर्थिकदृष्ट्या शून्यावर आलो’, सिनेमासाठी विकली जमापुंजी, डोक्यावर लाखोंचं कर्ज; मराठी अभिनेत्यानं सांगितला कठीण काळ
सीतेची भूमिका साकारणाऱ्या अंजली अरोरा चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दल सांगताना म्हणाली की, ‘माझ्यासाठी सीतेची भूमिका साकारणं हा माझ्या आयुष्यातील सर्वात भावनिक क्षण आहे. त्या अथांग सामर्थ्य, प्रतिष्ठा, संयम आणि श्रद्धेचं प्रतीक आहेत.’