म्युचल फंडमध्ये गुंतवणूक करणारे तसेच डिमॅट खाते असणाऱ्या प्रत्येक खातेधारकांसाठी एक महत्वाची सूचना आहे. SEBI ने नॉमिनीच्या संबंधित असणाऱ्या जुन्या नियमांमध्ये बदल केला आहे. नॉमिनी निवडीची प्रक्रिया तसेच नॉमिनी टाळण्याची प्रक्रिया आता पूर्णपणे सोप्पी करण्यात आली आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांना प्रक्रियेदरम्यान होणारा त्रास कमी होणार आहे. गुंतवणूकदारांनी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या.

नॉमिनी ठरवण्याची प्रक्रिया करण्यात आली सोप्पी
आता फक्त 3 नॉमिनी ठेवता येणार आहेत. मध्यंतरी, SEBI ने एकूण नॉमिनीची मर्यादा 10 पर्यंत ठेवली होती. पण त्यात बदल करून मर्यादा पुन्हा 3 पर्यंत आणण्यात आली आहे. जर तिन्ही नॉमिनीच्या हिस्स्यांसंबंधित टक्केवारी पुरवायची असेल तर गुंतवणूकदाराला तशी मुभा देण्यात आली आहे. जर हिस्स्यांची टक्केवारी उपलब्ध नसेल तर गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर सगळ्या नॉमिनीजला समान हिस्स्यांमध्ये वाटा मिळेल. नॉमिनी ठरवण्यासाठी गुंतवणूकदाराला आता फार काही कष्ट घ्यावे लागणार नाही आहेत. नॉमिनीला रजिस्टर करताना फक्त नॉमिनीचे नाव आणि गुंतवणूकदार किंवा अकाउंट होल्डरशी असलेलं त्यांचं नातं, इतकीच माहिती पुरवणे बंधनकारक असणार आहे.
जर गुंतवणूकदाराला नॉमिनी हवा नसले तर…
जर गुंतवणूकदाराला नॉमिनी नको हवाय तर तो गुंतवणूकदाराचा प्रश्न आहे. आधी जर गुंतवणूकदाराला नॉमिनी नको होता तर एक व्हिडीओ तयार करून स्पष्टीकरण द्यावे लागत होते, पण आता तितके करण्याची गरज नाही. एक साधारण ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म सादर करूनही नॉमिनी टाळता येते.
शिक्षक मागताहेत गलेलठ्ठ पगार, OPS, रिटायरमेंटचे वय अन् भरपूर सुट्ट्या; मॅरेथॉन बैठकीनंतर 8व्या वेतन आयोगातील नवीन अपडेटनॉमिनी नसेल तर गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर गुंतवणूकदाराच्या डिमॅट खात्यातील रक्कम तसेच म्युचल फंडमध्ये असणारी रक्कम गुंतवणूकदाराच्याच वारसा हक्काला मिळते, फक्त प्रोसेस थोडी अवघड होऊ शकते. लाभ कर्त्यांना गुंतवणूकदाराची रक्कम मिळवण्यात जास्त कष्ट घ्यावे लागू शकतात. जर गुंतवणूकदाराने आधीच नॉमिनी ठरवला असेल तर अवघड प्रक्रिया टाळता येते. जरी खात्याला नॉमिनी असला तरी त्यावर पूर्ण हक्क गुंतवणूकदाराचाच राहील. गुंतवणूकदार किंवा अकाउंट होल्डर जिंवत असेपर्यंत त्या खात्यासंबंधित सगळ्या कामांसाठी खातेधारक स्वतः उपस्थित असणे आवश्यक आहे.

