Headlines

SBI BSBD Cash Withdrawal Rules; SBI खात्यातून कॅश विड्रॉवलचे नवीन नियम; चारपेक्षा जास्‍त वेळा व्‍यवहार केल्‍यास ग्राहकांना भुर्दंड, फ्री लिमिटनंतर शुल्क लागणार


SBI Banking News : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमचे खाते असेल आणि तुम्ही महिन्यातून अनेकदा रोख रक्कम विड्रॉ करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट म्हणजे BSBD खातेधारकांसाठी महत्त्वाची अपडेट आली आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक SBI ने आपल्या बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट खातेधारकांसाठी सेवा शुल्कात सुधारणा केली आहे, जी 1 ऑक्टोबर 2026 पासून लागू होईल.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या BSBD खात्याचे नियम बदलले

बँकेने शाखांमार्फत रोख रक्कम काढण्यासंबंधी नियमांमध्येही सुधारणा केली असून SBI ने बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट खात्यांमधून कॅश विड्रॉलसंबधी नियम पूर्णपणे बदलले आहेत. अशाप्रकारे, नवीन नियम लागू झाल्यानंतर एसबीआयच्या ग्राहकांना एका महिन्यात निर्धारित रकमेपेक्षा जास्त रोख रक्कम काढल्यास शुल्क भरावे लागू शकते.

Maharashtra TimesCAS Manipulation: 3.68 कोटींचा घपला, Share Market मध्येही एन्ट्री बॅन; CAS फेरफार प्रकरणी दोन संस्थांवर सेबीची ॲक्शन

1 ऑक्टोबरपासून बदलणार एसबीआयचा नियम

1 ऑक्टोबर 2026 पासून नवीन नियम लागू होणार असून त्यानंतर, BSBD खात्यातून दरमहिन्याला पहिल्या चार वेळा कोणत्याही शुल्क किंवा चार्जेसशिवाय पैसे काढण्याची मुभा दिली आहे. पण त्यानंतर एका महिन्यात निर्धारित रकमेपेक्षा जास्त पैसे काढल्यास 15 रुपये शुल्क आणि जीएसटी आकारला जाईल. इतकेच नाही तर, नव्या नियमांनुसार 4 विनामूल्य पैसे काढण्याच्या सुविधेमधून डिजिटल व्यवहारांना दिलेली सूट पूर्णपणे रद्द केली गेली आहे. म्हणजे आता नव्या नियमांमध्ये चार मोफत पैसे काढण्याच्या मर्यादेत डिजिटल व्यवहारांचाही समावेश केला जाईल.

Maharashtra TimesGlobal Bond Sell-off: जागतिक बाजारात टेन्शनचा माहौल; बाँड बाजारातील मृगजळ पाहून भलेभले चक्रावून गेले, भारतावरही होणार परिणामएसबीआयचे BSBD खाते काय आहे?

बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट अकाउंट मुख्यतः अशा ग्राहकांसाठी आहे ज्यांना किमान शिल्लक रकमेशिवाय बँकिंग लाभांचा आनंद घ्यायचा आहे. म्हणजे या BSBD खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवायची अट नसते, त्यामुळे विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांसाठी उपयुक्त ठरते.

BSBD खात्याद्वारे ग्राहक एटीएम किंवा बँकेच्या शाखेतून पैसे काढण्याच्या फॉर्मद्वारे पैसे काढू शकतात. एसबीआय या खात्यासोबत बेसिक रुपे एटीएम-कम-डेबिट कार्डदेखील देते.

Maharashtra TimesEPF Withdrawal Rule: नोकरी सुरू होऊन फक्त 1 महिना झाला, तरी Medical Emergency मध्ये PF विड्रॉ करता येतो; अनेकांना माहिती नाही नियम

एसबीआय बीएसबीडी खात्याची वैशिष्ट्ये

  • खातेदाराला बेसिक RuPay ATM-कम-डेबिट कार्ड दिले जाते.
  • या कार्डवर कोणतेही वार्षिक मेंटेनन्स शुल्क आकारले जात नाही
  • या खात्यातून बँकेच्या शाखेमार्फत किंवा एटीएमद्वारे पैसे काढता येतात.
  • या खात्यामध्ये चेकबुकची सुविधा नाही.
  • एनईएफटी आणि RTGS सारख्या इलेक्ट्रॉनिक ठेवींसाठी कोणतेही शुल्क नाही.
  • दीर्घकाळ निष्क्रिय खाते पुन्हा सुरू करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही पण, खाते बंद करण्यासाठी निश्चित शुल्क आकारले जाते.

चार मोफत विड्रॉल सुविधेमध्ये कोणत्या व्यवहारांचा समावेश

एसबीआयच्या माहितीनुसार 1 ऑक्टोबरपासून एका बीएसबीडी खात्यातून दरमहिन्याला जास्तीत जास्त 4 मोफत विड्रॉलची सुविधा दिली जाईल, ज्यामध्ये खालील व्यवहारांचा समावेश असेल:

  • एसबीआयच्या एटीएममधून रोख रक्कम काढणे
  • दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून रोख रक्कम काढणे
  • बँकेच्या शाखेतून रोख रक्कम काढणे
  • AEPS द्वारे रोख व्यवहार

अशा परिस्थितीत, तुमच्या BSBD खात्यातून महिन्यातून अनेकदा विड्रॉल करत असाल तर 1 ऑक्टोबर 2026 नंतर होणारा हा बदल लक्षात ठेवा. 4 वेळा मोफत कॅश विड्रॉलनंतर प्रत्येक अतिरिक्त विड्रॉलसाठी तुम्हाला 15 रुपये + जीएसटी शुल्क आकारले जाईल.

एसबीआय बीएसबीडी खाते उघडायची अट

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एखाद्याला BSBD खाते सुरू करायचे असेल तर, यासाठी एक अट आहे ती म्हणजे की तुमचे दुसरे कोणतेही बचत खाते नसले पाहिजे. त्यामुळे, तुमचे आधीपासूनच बचत खाते असेल, तर BSBD खाते उघडल्याच्या 30 दिवसांत तुम्हाला तुमचे जुने बचत खाते बंद करणे अनिवार्य असेल.