Tax on Saving Account: आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीकडे किमान एक बचत खाते असेलच, पण अशा खात्यात तुम्ही किती पैसे ठेवू शकता तुम्हाला माहीत आहे का? आयकर विभागाच्या नजरेत न येता बचत खात्यात किती पैसे ठेवायचे? तुम्ही ही मर्यादा ओलांडली किंवा पैसे जमा करताना काही चूक केली, तर तुम्हाला आयकर विभागाची नोटीस येऊ शकते.

तुम्हाला माहित आहे का की बचत खात्यात किती पैसे ठेवता येतात, जेणेकरून तुम्हाला आयकर विभागाची नोटीस येणार नाही? आयकर विभागाची कारवाई टाळण्यासाठी इन्कम टॅक्स विभागाचा नियम पूर्णपणे समजून घेणे फायदेशीर ठरेल.
बचत खात्याबाबत आयकर विभागाचा नियम
अनेक लोक आपल्या कष्टाची कमाई बचत खात्यांमध्ये जमा करतात, पण फार कमी लोकांना माहिती असेल की बँक खात्यात मोठी रक्कम जमा करणे किंवा व्यवहार करणे आयकर विभागाचे लक्ष वेधून घेऊ शकते. अशा परिस्थितीत, तुम्हाला विभागाकडून नोटीस देखील मिळू शकते. त्यामुळे बचत खात्यात पैसे जमा करण्यापूर्वी नियमांची माहिती असली पाहिजे जेणेकरून मर्यादा आणि इतर बाबींची माहिती असेल.
बचत खात्यावर आयकर विभागाची नजर
तुम्ही केवळ तुमच्या अकाउंटमध्ये एकरकमी किंवा वर्षभरात मोठी रक्कम जमा केल्यामुळे आयकर विभाग नोटीस बजावत नाही.आयकर विभाग प्रामुख्याने मोठ्या रोख ठेवी किंवा संशयास्पद व्यवहारांवर लक्ष ठेवतो. सध्याच्या आयकर नियमांमुळे बँकांना आर्थिक वर्षात बचत खात्यांमध्ये एकूण 10 लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या ठेवींची माहिती देणे बंधनकारक आहे, तर चालू खात्यांसाठी 50 लाख रुपयांची मर्यादा आहे.
खात्यात कॅश जमा करण्यावर आयकर नोटीस
बचत खात्यांतील 10 लाखांची काही प्रकरणांमध्ये अनेक खाती एकत्र करूनही कॅलक्युलेट केली जातात, पण आयकर कायद्यानुसार तुम्ही एका वर्षात 10 लाखांपेक्षा जास्त रक्कम कॅशमध्ये जमा केल्यास ही माहिती आयकर विभागाला कळवणे बंधनकारक असून हा नियम चालू खात्यांनाही लागू होतो, पण अट अशी आहे की तुमच्या खात्यात रोख रक्कम जमा करणार नाही याची खात्री केली पाहिजे.
आयकर विभाग करदात्यांना नोटीस कधी पाठवतो
- तुमच्या उत्पन्नाचे स्रोत उघड केलेले असतील आणि तुमच्या ITR मध्ये अचूक माहिती दिली असल्यास सहसा कोणतीही अडचण येत नाही.
- तुमचे उत्पन्न आणि जमा रक्कम या दोन्हीमध्ये तफावत आढळल्यास तुम्हाला नोटीस मिळू शकते.
- तुम्ही वारंवार मोठ्या रकमेचे रोख व्यवहार करत असाल, तरीही तुम्हाला कर नोटीस मिळू शकते.
- आयटीआर दाखल न करता तुम्ही मोठ्या रकमेचे व्यवहार केल्यास तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
- तुमचा पॅन लिंक केलेला नसल्यास तुम्हाला कर नोटीस मिळू शकते.
- कोणतेही संशयास्पद व्यवहार आढळल्यास निश्चित नोटीस मिळेल.

