Headlines

Satish Rajwade Shared School Memories Of Class Teacher Defended After Principal Scold ; Satish Rajwade School Days : सतीश राजवाडेंनी शाळेत वॉशरुमच्या भिंतीवर लिहिलेले असे काही की शिक्षेच्या भीतीने स्पिकरच चोरला, कांड समोर आला पण आयुष्य बदललं


शाळेत असताना काहीजण हुशार असतात तर काहीजण द्वाड! काही जणं तर द्वाड असले तरीही अभ्यासात मात्र भरपूर हुशार असतात. मोठे झाल्यावर शाळेतल्या त्या आठवणी आठवणी आपसूकच चेहऱ्यावर हसू येतं. या शाळेत मुलाचा पाठिंबा देणारे शिक्षक हे सुद्धा महत्त्वाचे असतात. चुकलो तर काम पकडणारे आणि उत्तम कामगिरी केल्यावर पाठीवर शाब्बासकी देणारे हे शिक्षक नेहमीच आयुष्याला एक वेगळे वळण देतात. शाळेतल्या गोड आठवणीत रमायला कोणाला आवडत नाही. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमांमध्ये स्टार प्रवाह चॅनल हेड तसेच दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश राजवाडे यांनी त्यांच्या शाळेचा किस्सा सांगितला.

स्टार प्रवाह वर लवकरचआमच्या लाडक्या नाईक बाई ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यानिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत सतीश राजवाडे यांनी त्यांच्या शाळेतल्या आठवणींना उजाळा दिला.

ते म्हणाले की, मी शाळेत असताना खूप मस्तीखोर होतो. खरंतर मस्तीखोर हा शब्द सुद्धा कमीच पडेल इतका मी दंगा करायचो. असाच एकदा मी शाळेत कांड केला होता. शाळेच्या वॉशरुममध्ये मी लिहून ठेवलेलं की, इस अंजूमन में आपको आना है बार बार! आणि त्या खाली त्याचे लेखक म्हणून शाळेच्या मुख्याध्यापकांचे नाव लिहिले होते. माझ्या अक्षरावरुन हे मीच लिहिलं आहे ते सगळ्यांना समजलं.

राजवाडे पुढे म्हणाले की, आमच्या शाळेत प्रार्थनेनंतर महिन्यात मस्ती कोणी केली वगैरे सगळं नावासकट अनाउंन्स करायचे. तेव्हा मला भीती वाटलेली की मी केलेल्या मस्तीमुळे अख्ख्या शाळेसमोर माझं नाव अनाउंस होईल, त्यामुळे त्यादिवशी शाळा सुटल्यावर मी वर्गातला स्पीकरच चोरला. तेव्हा माझ्या डोक्यात आलेलं की या स्पीकरवरुन माझ्या वर्गात कोणी ऐकलं नाही तर कोणीच ऐकणार नाही. तेव्हा माझी अक्कल इतकी तोकडी होती की जरी मी माझ्या वर्गाचा स्पिकर चोरला असला तरी उरलेल्या सर्व शाळेला ते ऐकू गेलं असतं हा विचारच मी केला नाही. शिवाय स्पिकर चोरायचे पराक्रम मीच करु शकतो हे जग जाहिर होतं.

Maharashtra TimesTharala Tar Mag : अर्जुनची पुढची चाल ओळखून महिपतने आधीच लावली सेटिंग, सायलीचे ते फोटो पाहून हादरा! सचिन डिवचायला पुन्हा सुभेदारांच्या घरी
त्यानंतर मला मुख्याध्यापिकांच्या केबीनमध्ये बोलावलं. माझ्यासोबत माझ्या वर्गशिक्षकासुद्धा होत्या. मुख्याध्यापक म्हणाले की याला 7 दिवस रस्टिकेट करा. पण आमच्या बाई तिथे माझ्यासाठी उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या असं नका करु. मुख्याध्यापकांनी त्यांना विचारलं की तुम्ही त्याला पाठीशी का घालत आहात? यावर त्या म्हणाल्या की आज जर तुम्ही याला यासाठी शिक्षा केली तर तो हेच परत परत करत जाईल. आपण त्यालाच विचारू की त्याने तो स्पिकर का चोरला. मी यावर म्हणालो की, मला लाज वाटली. मी असं काहीतरी चुकीचं केलं आहे आणि माझं नाव वर्गासमोर येईल. मला माझं नाव माझ्या वर्गासमोर अनाउन्स व्हायला नको होतं.

Maharashtra TimesSalman Khan And Sister Alvira Summoned : खोटं आमिष दाखवून फसवल्याप्रकरणी सलमान खान आणि त्याची बहीण अलविरा अग्निहोत्रीला कोर्टाची नोटीस, बिझनेसमनने लावलेले गंभीर आरोप
मग आमच्या बाईंनी मुख्याध्यापिकांना सांगितलं की, जर त्याला जाणवतंय, त्याला लाज वाटतेय म्हणून त्याने काढलं म्हणजे तो यातूनच धडा शिकला आहे. अजून जर शिक्षा केली तर गडबड होऊ शकते. त्यादिवशी पहिल्यांदा मी शाळेत रडलेलो. मी काटावर पास व्हायचो, त्यामुळे शाळेला चिंता असायची की या मुलांमुळे आपला 10 वी चा निकाल 100 % लागणार नाही. पण हा किस्सा 8 वीत घडला अन् 9 वी व 10 वी ला मी एक फर्स्ट क्लास विद्यार्थी झालेलो. मला माझ्या बाईंना दाखवायचं होतं की त्यादिवशी तुम्ही माझी बाजू घेतली ते मी व्यर्थ जाऊ दिलं नाही.

तो शाळेत चोरलेला स्पिकर अजूनही माझ्याकडे आहे. तो मी शाळेत असताना वॉकमनला कनेक्ट करुन मोठ्याने रुममध्ये ऐकायचो. नंतर प्रिलियमच्या वेळीही अलार्मला तो कनेक्ट केलेला त्यामुळे मी लवकरच उठायचो. मी यासाठी शाळेची माफी मागतो. पण तो मी अजूनही परत देणार नाही.

स्टार प्रवाहवर .येत्या 10 ऑगस्टपासून आमच्या लाडक्या नाईकबाई ही मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या मुख्य भूमिकेत असणार आहे तर अभिनेत्री अमृता धोंगडे ही विरोधी भूमिकेत दिसणार आहे.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत