Rajpal Yadav Properties To Be Auctioned In Rs 16 Crore Loan Case ; Rajpal Yadav : तुरुंगात असलेल्या राजपाल यादववर मोठं संकट, वडिलोपार्जित घराचा होणार लिलाव, मालकी जमिनीवरही बँकेची नोटीस
Rajpal Yadav Properties To Be Auctioned In Rs 16 Crore Loan Case ; Rajpal Yadav : तुरुंगात असलेल्या राजपाल यादववर मोठं संकट, वडिलोपार्जित घराचा होणार लिलाव, मालकी जमिनीवरही बँकेची नोटीस
अभिनेते राजपाल यादव यांच्या चेक बाउन्स प्रकरणाच्या अडचणी काही कमी होत नाहीये, या प्रकरणी कारावासाची शिक्षा भोगूनही आता संकाटाची सावली त्यांच्या घरावर आली आहे. आता ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’ त्याच्याकडील थकीत कर्ज वसूल करण्यासाठी त्याची मालमत्ता लिलावात काढण्याच्या तयारीत आहे. ही मालमत्ता मध्य प्रदेशातील बांदा येथे असून त्याची किंमत 3.10 कोटी रुपये इतके आहे. वसुलीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी बँकेने ‘कचहरी रोड’वरील त्याच्या वडिलोपार्जित घराबाहेर लिलावाची नोटीस लावली आहे; तसेच त्याच्या मालकीच्या आणखी एका जमिनीबाहेरही अशीच नोटीस लावण्यात आली आहे. विशेष म्हणजे, राजपाल यादवची पत्नी राधा यादव आणि आई गोदावरी देवी यांच्या नावेही 16.61 कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे आणि त्याची वसुली प्रक्रिया अनेक वर्षांपासून सुरू आहे.
आता लिलावासाठी निश्चित केलेली मालमत्ता कर्ज न फेडल्यामुळे ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’ने 2024 मध्ये जप्त केली होती. हे 5 कोटी रुपयांचे कर्ज उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील त्याचे वडील नौरंग यादव यांच्या मालकीची मालमत्ता तारण ठेवून घेण्यात आले होते. कर्ज न फेडल्यामुळे थकीत रकमेचा आकडा वाढून 11 कोटी रुपयांवर पोहोचला. त्यानंतर, 8 ऑगस्ट 2024 रोजी बँकेच्या ‘वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स’ शाखेच्या एका पथकाने शाहजहांपूरला भेट देऊन ती मालमत्ता सील केली.
मालमत्तेच्या खरेदी-विक्रीवर बंदी
बँकेने संबंधित मालमत्तेवर एक फलक लावला होता, ज्यामध्ये स्पष्टपणे नमूद केले होते की ही मालमत्ता आता ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’च्या मालकीची आहे आणि तिची खरेदी-विक्री किंवा तत्सम कोणतेही व्यवहार केले जाऊ नयेत. राजपाल यादवने आपली पत्नी आणि आई यांच्या नावे घेतलेले 16.61 कोटी रुपयांचे कर्ज न फेडल्यामुळे, बँकेने हे खाते ‘डिफॉल्ट’ म्हणून घोषित केले आणि वसुलीची प्रक्रिया सुरू केली.
वडिलांची मालमत्ता गहाण ठेवून घेतलेले कर्ज
जेव्हा बँकेने 2024 मध्ये राजपाल यादवच्या मालमत्तेबाबत वसुलीची नोटीस बजावली होती, तेव्हा अभिनेत्याने बँकेशी चर्चा केली होती आणि कर्ज परतफेडीबाबत एक करारही झाला होता. मात्र, ठरलेल्या मुदतीत कर्ज परत न केल्यामुळे, आता ‘मुंबई डेट रिकव्हरी ट्रिब्युनल’च्या आदेशानुसार वसुलीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यासाठी 9 सप्टेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, लिलावासाठी काढण्यात आलेल्या राजपाल यादवच्या मालमत्तांमध्ये केवळ मुंबईतील फ्लॅट्सचाच नाही, तर त्यांच्या ‘कुंद्रा’ या मूळ गावातील जमीन आणि घराचाही समावेश आहे.
राजपाल यादव सध्या 16 वर्षे जुन्या ‘चेक बाऊन्स’ प्रकरणात तुरुंगात
राजपाल यादव हा 2010 मधील ‘अता पता लापता’ या चित्रपटाशी संबंधित ‘चेक बाऊन्स’ प्रकरणात सध्या तिहार तुरुंगात आहेत. 10 जुलै रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने अभिनेत्याला तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने त्याच्यावर दंडही आकारला आणि त्यांच्या वर्तणुकीचे वर्णन ‘संशयास्पद’ असे केले. राजपाल यादवने हा चित्रपट तयार करण्यासाठी 2010 मध्ये 5 कोटी रुपये कर्ज घेतले होते. ही रक्कम परत करण्याचे आश्वासन वारंवार देऊनही, तो तसे करण्यात अपयशी ठरला. सात वेगवेगळ्या ‘चेक बाऊन्स’ प्रकरणांमध्ये त्याच्याकडे अंदाजे 9 कोटी रुपयांची थकबाकी होती.
फेब्रुवारीमध्ये 12 दिवस तुरुंगात घालवले; आता पुन्हा शिक्षा
या प्रकरणात, सत्र न्यायालयाने 2024 मध्ये राजपाल यादवला दोषी ठरवून सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, या अभिनेत्याने दिल्ली उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिले आणि न्यायालयाने शिक्षेला तात्पुरती स्थगिती दिली. तरीही, याच प्रकरणाच्या संदर्भात राजपाल यादवला 5 फेब्रुवारी 2026 रोजी तिहार तुरुंगात शरण जावे लागले होते आणि त्याने 12 दिवस कोठडीत घालवले होते. आता तो पुन्हा तुरुंगात आहे.
लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.… आणखी वाचा