सातारा : सातारा नगरपरिषदेच्या बारनिशी विभाग ते मुख्याधिकारी कॅबिनकडे जाणाऱ्या जिन्यामध्ये पोलिसांसमश्न दोघांनी मारामारी केल्याची घटना घडली.
याप्रकरणी दोघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेदि. २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास सातारा नगरपरिषदेच्या बारनिशी विभाग ते मुख्याधिकारी कॅबिनच्या जिन्यामध्ये ठेकेदार श्रीकांत राठोड (रा. सदर बाजार, सातारा) आणि सतीश बबनराव लेवे (रा. ३१, चिमणपुरा पेठ, सातारा) यांच्यात वाद झाला.
यावेळी सतीश लेवे याने श्रीकांत राठोड यांच्या कानाखाली मारली. ही मारामारी झाली त्यावेळी पोलिस कर्मचारीही त्यावेळी तिथे उपस्थित होते. या प्रकारामुळे सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बिघडल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार महेंद्र पाटोळे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
