Sarangkheda Horse Market Nandurbar BJP MLA Rahul Kul son Aaditya Kul buys Nukra Horse worth Rs 11 Lakh; सारंगखेडा अश्वबाजारात पुणे दौंड भाजप आमदार राहुल कुल यांचा मुलगा आदित्य कुल याची खरेदी, 1111111 रुपयांना घेतलेल्या नुकरा घोडीची वैशिष्ट्यं काय?
Sarangkheda Horse Market Nandurbar BJP MLA Rahul Kul son Aaditya Kul buys Nukra Horse worth Rs 11 Lakh; सारंगखेडा अश्वबाजारात पुणे दौंड भाजप आमदार राहुल कुल यांचा मुलगा आदित्य कुल याची खरेदी, 1111111 रुपयांना घेतलेल्या नुकरा घोडीची वैशिष्ट्यं काय?
Sarangkheda Horse Market : जातिवंत आणि उमद्या घोड्यांसाठी प्रसिद्ध असलेला नंदुरबार येथील सारंगखेडा अश्व बाजार विविध प्रांतातील घोड्यांच्या आगमनाने बहरलाय
सारंगखेडा घोडेबाजार येथे आदित्य राहुल कुल यांची अश्वखरेदी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
महेश पाटील, नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील अश्व बाजार फक्त महाराष्ट्रच नाही, तर जगभरात प्रसिद्ध आहे. यंदाही येथील बाजारात विविध राज्यांतून अश्व विक्रीसाठी दाखल झाले आहेत. दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांचे सुपुत्र आदित्य कुल यांचेही अश्वप्रेम यावेळी पाहावयास मिळाले. आदित्य कुल यांनी येथील अश्व बाजारातून 11 लाख 11 हजार 111 रुपये किमतीची नुकरा जातीची घोडी खरेदी केली. या अश्व बाजारात दरवर्षी अनेक सेलिब्रिटी घोडे खरेदीसाठी येत असतात.
जातिवंत आणि उमद्या घोड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा येथील अश्व बाजार विविध प्रांतातील घोड्यांच्या आगमनाने बहरला आहे. घोडे बाजारात सुमारे 1800 घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. आतापर्यंत घोड्यांच्या विक्रीतून 50 लाखांहून अधिक उलाढाल झाली आहे. असे असले तरी युवराज, सुलतान, रुबी आणि मानसी या अश्वांची चर्चा असून अश्व शौकीन त्यांना पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.
भरतपूर (राजस्थान) येथील कृष्णवीरसिंग राजपूत यांच्या मालकीची २० महिने वयाची नुकरा जातीची घोडी दौंडचे आमदार राहुल कुल यांचे पुत्र आदित्य यांनी 11 लाख 11 हजार 111 रुपयांमध्ये खरेदी केली. आदित्य हे पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज येथील लॉ कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. अश्वांची आवड असल्याने खरेदी केल्याचे आदित्य यांनी सांगितले. मागील वर्षीही सारंगखेडा येथे एका घोड्याची खरेदी त्यांनी केली होती.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सारंगखेडा हे गाव तापी नदीकाठी वसलेले आहे. येथील एकमुखी दत्ताचे मंदिर प्रसिद्ध आहे. या ठिकाणच्या भरणाऱ्या यात्रा उत्सवाला जवळपास 350 वर्षांची परंपरा आहे. येथील अश्व बाजार देशासह परदेशातही प्रसिद्ध आहे. भारतातील पुष्करनंतर येथील अश्व बाजाराची मोठ्या प्रमाणावर गणना होते. Solapur Crime : 12 वर्ष प्रेम, लग्न करुन 8 वर्ष सोबत राहिला, आता मुलीसोबत बोहल्यावर चढतोय; सोलापुरातील तृतीयपंथियाने व्हिडिओ करत आयुष्य संपवलं या अश्व बाजाराबाबत अनेक पुरातन नोंदी आढळून येतात. इतिहास काळात श्री महाराणा प्रताप, श्री छत्रपती शिवाजी महाराज, श्री संभाजी महाराज यांनीही येथून घोडे खरेदी केल्याचे बोलले जाते. छत्रपती संभाजी महाराजांनी युद्ध काळात मुघलांशी लढताना या परिसरात तापीकाठी वास्तव्य केले असल्याची नोंद आहे. या ऐतिहासिक घोडेबाजारात घोडे खरेदी केल्याचीही नोंद आहे. याचा दाखला छत्रपती संभाजी महाराज मालिकेतून देण्यात आला आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा