![]()
गुलटेकडी (डायस प्लॉट) परिसरात राहणारे बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे पुणे शहर आणि बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शेख यांनी आत्महत्येपूर्वी एक सविस्तर सुसाईड नोट लिहिली असून, काही गंभीर आरोप करणारे व्हिडिओदेखील प्रसारित झाले आहेत. लक्ष्मी रस्त्यावरील वक्फ बोर्डाच्या जागेवर ‘उत्कर्ष असोसिएट्स’ या भागीदारी फर्ममार्फत बांधकाम प्रकल्प सुरू होता. या फर्ममध्ये माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, मनसेचे माजी नगरसेवक बाळासाहेब शेडगे यांच्या पत्नी, सुनील आहेर यांचा मुलगा, हमीद शेख यांचा मुलगा आणि रघु गावडे हे भागीदार होते. वक्फ बोर्डाची जागा खरेदी करून बांधकाम सुरू करण्यासाठी बँकांकडून कर्ज घेण्यात आले होते. मात्र, वक्फ बोर्डाने स्थगिती दिल्याने हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आणि बांधकाम रखडले. यामुळे खलील शेख यांच्यावरील कर्जाचा बोजा वाढला. मृत्यूपूर्वीच्या व्हिडिओमध्ये त्यांनी, रवींद्र धंगेकर यांनी या आर्थिक अडचणींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. व्हिडिओमध्ये माजी नगरसेवक बाळासाहेब शेडगे यांच्यावर गंभीर आरोप शेख यांनी सुसाईड नोट आणि व्हिडिओमध्ये माजी नगरसेवक बाळासाहेब शेडगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ‘उत्कर्ष असोसिएट्स’कडून त्यांना ५० लाख रुपये (२० लाख मूळ पेमेंट आणि ३० लाख इतर बिलांचे) येणे बाकी होते. हे पैसे न मिळाल्याने ते स्वतः गेल्या तीन वर्षांपासून या रकमेवर व्याज भरत होते. व्हिडिओमध्ये शेख यांनी म्हटले आहे की, बाळासाहेब शेडगे त्यांचे हक्काचे पैसे न देता दादागिरी करत होते. त्यांनी आपल्याला पुण्यात जगणे मुश्किल करण्याची आणि मुलाबाळांना संपवण्याची धमकी दिली होती. आपल्या मृत्यूला बाळासाहेब शेडगे आणि त्यांचा मुलगा जबाबदार असतील, असेही त्यांनी नमूद केले आहे. सुसाईड नोटमध्ये त्यांनी इतर प्रकल्पांमधील फसवणुकीचाही उल्लेख केला आहे. कसबा पेठेतील ‘झांबरे चावडी’ येथील इमारतीमधील चार फ्लॅट्सच्या विक्री व भाड्याच्या हिशोबात भागीदार विशाल केदारी आणि हामिद शेख यांनी १ कोटी ५४ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विजय बिल्कॉन व अक्षय कन्स्ट्रक्शन: विजय बिल्कॉनशी संबंधित व्यवहारात राजन शेटीया यांनी ४० लाखांचा फ्रॉड केल्याचा, तर अक्षय कन्स्ट्रक्शनच्या कामापोटी शाम कोळपकर यांच्याकडून ६ लाख रुपये येणे बाकी असल्याचा उल्लेख चिठ्ठीत आहे. हेही वाचा.. जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघातातील मृतांचा आकडा वाढला:उपचारादरम्यान आणखी एका महिलेचा मृत्यू, आता बळींची संख्या 4 वर जेजुरी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात 13 जुलै रोजी झालेल्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा आता चारवर पोहोचला आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या शैलजा दिनकर जगताप (वय 58, रा. कवलापूर, ता. मिरज, जि. सांगली) यांचा पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यापूर्वी या दुर्घटनेत तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. सविस्तर वाचा
Source link
पुण्यात बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांची आत्महत्या:कर्जबाजारीपणाला कंटाळून टोकाचे पाऊल; सुसाईड नोट, व्हिडिओत गंभीर आरोप
