Sanjay Raut On Nashik Kumbh Mela: नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांत २५ हजार कोटींची उधळपट्टी होणार असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

नाशिककरांनी मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्यावर आणि त्यांच्या भाषणावर बहिष्कार टाकल्याचे दिसून येते, असा दावाही राऊत यांनी केला. लोकांनी मुख्यमंत्र्यांकडे गांभीर्याने पाहणे सोडले आहे, अशी टीकाही त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. २८) झालेल्या ‘सिंहस्थ महाकुंभ भक्तिसंगम’ कार्यक्रमातील गर्दीवरून राऊत यांनी टीका केली.
Nashik Crime: सहा कैद्यांचा कारागृह शिपायावर हल्ला; अधीक्षकांच्या संचार फेरीवेळी धुडगूस, काय घडलं?‘राऊतांना अर्धवट माहिती’
नाशिकमधील कार्यक्रमाबाबत मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी प्रत्युत्तर दिले. राऊत स्वतः कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती पोहोचविण्यात आली आहे, असे त्या म्हणाल्या. मुळात ‘भक्ती संगम’ कार्यक्रम सिंहस्थ प्राधिकरणाचा होता. या कार्यक्रमासाठी साधू-महंतांसह विशिष्ट निमंत्रितांनाच आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी पास देण्यात आले होते. तसेच जास्तीच्या खुर्च्या रात्रीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ठेवल्या होत्या. त्यामुळे राऊत यांचे विधान अर्धवट माहितीच्या आधारे आहे, असा आरोप महापौर आहेर-आडके यांनी केला. कुंभमेळ्यासंदर्भात अशा प्रकारचे ट्वीट करणे अयोग्य आहे. कुंभमेळ्याच्या कार्यक्रमांना बदनाम करण्याचे षडयंत्र ठाकरे गटाने थांबवावे, असे आवाहनही महापौरांनी केले.
Samruddhi Mahamarg Robbery: महामार्गावर चोरट्यांची ‘समृद्धी’; टायर पंक्चरचा सापळा रचून 18 लाख लुटले, वकिलाच्या कुटुंबाला मारहाणसंजय राऊत म्हणाले…
– कुंभमेळ्यातील कथित भ्रष्टाचारावर केवळ विरोधकच नव्हे, तर साधू-संतही उघडपणे बोलू लागले आहेत
– नाशिकमधील विकासकामांमध्ये कोणतेही नियोजन नाही
– सरकारला नाशिकमधील खड्डे दिसत नाहीत का? या खड्ड्यांमुळे झालेले मृत्यू दिसत नाहीत का ?
– केवळ निविदा काढणे व कंत्राटदारांना कामे देणे एवढेच सरकारचे काम, त्यामुळे नाशिककरांचे हाल होत आहेत.
– दहा वर्षांपूर्वी नाशिक दत्तक घेतल्याचे फडणवीस विसरले आहेत. शहराची दुर्दशा झाली आहे.

