Devdutt Padikkal Jersey : भारताने श्रीलंकेविरुद्धची दोन सामन्यांची टेस्ट मालिका १-० अशी जिंकली. या मालिकेत देवदत्त पडिक्कलने शानदार फलंदाजी करत ‘प्लेयर ऑफ द सीरीज’ पुरस्कार पटकावला. या मालिकेत खेळताना श्रीलंकेच्या कडक उन्हामुळे त्याच्या पाठीवर 37 नंबर आणि ‘Dev’ नावाचा जर्सी टॅन दिसून आला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि श्रीलंकेमधील दुसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. दोन सामन्यांची कसोटी मालिका भारताने १-० अशी खिशात घातली. मात्र दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेच्या खेळाडूंना सामना अनिर्णित करत भारताचा पराभव केल्यासारखेच आहे. पहिल्या सामन्यात भारताने १६५ धावांनी विजय मिळवला, तर दुसरा सामना अनिर्णित राहिला. या मालिकेत देवदत्त पडिक्कलची बॅट चांगलीच तळपली, त्याला मालिकावीर म्हणजेच ‘प्लेयर ऑफ द सीरीज’ पुरस्कार देत गौरवण्यात आलं. आता त्याने एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये त्याच्या जर्सीवरील नंबर आणि नाव टॅटूप्रमाणे पाठीवर उमटले आहे.
श्रीलंकेत खेळताना पडिक्कलला उष्ण हवामानाचा एक मजेशीर अनुभव आला. मैदानावर जर्सी घालून बराच वेळ खेळल्यामुळे त्याच्या पाठीवर सन टॅनने जर्सीवरल नाव आणि नंबर तयार झाले होते. पडिक्कलने या खास ‘टॅटू’चा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. त्याच्या पाठीवर ‘Dev’ हे नाव आणि ३७ नंबर अगदी स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे त्याचा हा अनोखा सन टॅन सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या मालिकेमध्ये पडिक्कललासाई सुदर्शन याच्या जागेवर खेळण्याची संधी मिळाली होता. या संधीचं सोनं करत पहिल्या कसोटीत दोन्ही डावात मिळून २११ धावा आणि दुसऱ्या कसोटीत एक डावात त्याने ११७ धावांची शतकी खेळी केली.
देवदत्त पडिक्कलने आतापर्यंत भारतासाठी ४ कसोटी सामने खेळले असून ६ डावांत ४१८ धावा केल्यात. त्याची टेस्ट क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी १६७ धावांची आहे. हा खेळी त्याने आताच पार पडलेल्या श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात केली होती. या फॉरमॅटमध्ये त्याची फलंदाजीची सरासरी ६९.६६ तर स्ट्राइक रेट ६०.१४ आहे. त्याने आतापर्यंत २ शतके आणि १ अर्धशतक झळकावले असून ४५ चौकार आणि २ षटकार त्याच्या नावावर आहेत.
फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पडिक्कलने आतापर्यंत ५८ सामन्यांच्या ९६ डावांत ४१२८ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या २३२ आहे. त्याच्या फर्स्ट क्लास कारकिर्दीत आतापर्यंत ११ शतके आणि २१ अर्धशतके आहेत. त्याची फलंदाजीची सरासरी ४५.३६ असून स्ट्राइक रेट ६०.२३ इतका आहे.
दरम्यान, देवदत्त पडिक्कल याने संघातील आपले स्थान मजबूत केले आहे. त्यामुळे पडिक्कलच्या जागेवर आता खेळण्यासाठी साई सुदर्शन याला वाट पाहावी लागू शकते.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा