Dia Mirza On Difficult Song Shoot With Emraan Hashmi : एक तर पारंपारिक मुस्लिम कुटुंबातली मुलगी अन् चक्क इम्रान हाश्मीसोबत गाण्याचं शूट; दिया मिर्झाने सांगितला किस्सा
Dia Mirza On Difficult Song Shoot With Emraan Hashmi : एक तर पारंपारिक मुस्लिम कुटुंबातली मुलगी अन् चक्क इम्रान हाश्मीसोबत गाण्याचं शूट; दिया मिर्झाने सांगितला किस्सा
Dia Mirza Old Memory :अभिनेत्री दिया मिर्झाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या करियरच्या सुरुवातीच्या काळाची एक आठवण सांगितली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री दिया मिर्झा तिच्या अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणामुळेही अनेकदा चर्चेत असते. नुकतेच तिने आपल्या करियरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल आणि चित्रपटांमध्ये काम करताना आलेल्या आव्हानांबद्दल बऱ्याच गोष्टी शेअर केल्या. तिने ‘तुमसा नहीं देखा’ या 2004 मध्ये आलेल्या सिनेमातील ‘मुझे तुमसे मोहब्बत है’ या गाण्याच्या शूटिंग संबंधित एक अनुभव सांगितला. या गाण्याचे शूटिंग तिच्यासाठी खूप आव्हानात्मक होते तरी, त्या अनुभवामुळे तिला कालांतराने स्वतःच्या शरीराबाबत आत्मविश्वास मिळवून दिला असे ती व्यक्त झाली.
‘मला 100 पुरुषांसमोर कपडे काढावे लागले’
गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान सेटवर उपस्थित असलेल्या शंभर पुरुषांसमोर तिला तोकड्या कपड्यांमध्ये परफोर्मन्स करावा लागला होता. सुरुवातीला हे तिच्यासाठी सोपे नव्हते, हे दियाने मान्य केले. अभिनेत्री म्हणाली, “या अनुभवाने मला अशा प्रकारे मुक्त केले ज्याची मी कधीच कल्पना केली नव्हती. ज्या आत्मविश्वासाने मी हे गाणे सादर करू शकले, त्यात कोरिओग्राफर वैभवी मर्चंट आणि संपूर्ण टीमचा मोठा हात होता; त्यांनी मला खूप सुरक्षित वातावरण करुन दिले. पण एक तरुणी म्हणून, मी केलेल्या सर्वात कठीण गोष्टींपैकी ही एक गोष्ट होती. सेटवर असलेल्या शंभर पुरुषांसमोर मला केवळ तोकडे कपडे शूट करावे लागले होते.”
दियाने पुढे सांगितले की, तोपर्यंत तिला हे उमजले होते की एका कलाकारासाठी त्यांच्या पात्राचे सत्य समजून घेणे आणि त्यातून मांडायचा आशय आत्मसात करणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे त्या सेटवर 500 लोक आहेत की 1000 याने मला काहीच फरक पडत नसे.”
ती पुढे म्हणाली, “माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील अनेक गोष्टींनी मला आजची कलाकार म्हणून घडवण्यात मदत केली आहे. एखाद्या सीनमध्ये मी जर बारकावे, खोली किंवा वैयक्तिक सत्यता आणू शकत असेन, तर त्याचे श्रेय गेल्या 25 वर्षांत मी घेतलेल्या अनुभवांना जाते. ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि मी यापुढेही शिकत राहण्याची व स्वतःमध्ये सुधारणा करत राहण्याची आशा करते.” ‘बॉलिवूड बबल’शी बोलताना दिया मिर्झाने या गोष्टी सांगितल्या.
“त्या चित्रपटामुळे मला माझ्या शरीराबद्दल आत्मविश्वास मिळाला”
दिया मिर्झा यांनी सांगितले की, ती हैदराबादमधील एका पारंपरिक विचारांच्या कुटुंबातून आली आहे आणि सुरुवातीला तिला स्वतःच्या शरीराबद्दल फारसा आत्मविश्वास नव्हता. मात्र, ‘तुमसा नहीं देखा’ या चित्रपटात काम केल्यामुळे तिच्यात मोठा बदल घडला. ती म्हणाली, “मी हैदराबादमधील एका पारंपरिक पार्श्वभूमीतून आले आहे. मला माझ्या शरीराबद्दल फारसा आत्मविश्वास नव्हता. त्या चित्रपटामुळे मला त्याबाबत खूप आत्मविश्वास वाटू लागला; विशेषतः ‘मुझे तुमसे मोहब्बत है’ या गाण्यामुळे मला खऱ्या अर्थाने मुक्त झाल्यासारखे वाटले.”
‘तुमसा नहीं देखा’ बद्दल
2004 मध्ये रिलीज झालेल्या ‘तुमसा नहीं देखा’ या चित्रपटात दिया मिर्झा हिने एका डान्सरची भूमिका साकारली होती, तर इम्रान हाश्मी एका श्रीमंत तरुणाच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाचे कथानक प्रेम आणि कौटुंबिक दबाव यांभोवती फिरते आणि तो हॉलिवूड चित्रपट ‘प्रिटी वुमन’ वरून प्रेरित होता. अनुराग बसू यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अनुपम खेर यांचीही मुख्य भूमिका होती.
दिया मिर्झाचे करियर
दिया मिर्झा अलीकडेच नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय वेब सिरीज ‘ऑपरेशन सफेद सागर’ मध्ये दिसली. या सिरीजमधील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. ही सिरीज 1999 च्या कारगिल युद्धादरम्यान भारतीय वायुदलाने राबवलेल्या एका हवाई मोहिमेवर आधारित आहे. यात जिमी शेरगिल, सिद्धार्थ, विनय पाठक, मनू ऋषी चड्ढा, अभय वर्मा, हर्ष ए. सिंग, आदिल हुसेन आणि बरुण सोबती यांसारख्या कलाकारांचाही समावेश होता.
लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.… आणखी वाचा