धनाजी चव्हाण, परभणी: “मनोज जरंगे पाटलांना मी विनंती केली की, साहेब ११ वाजताचा कार्यक्रम आहे आणि आपण ११ वाजताच रद्द करा म्हणता. मी तुमचाच आहे, तुमच्या हाकेला मी आतापर्यंत कधीच नाही म्हणलो नाही. त्यामुळे नाराज होऊ नका, पण मला कार्यक्रम रद्द करता येणार नाही,” असं म्हणत खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी इथं सुरू असलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर परभणीतील राजकीय कार्यक्रम घेऊ नये, अन्यथा मी तिथं येऊन धिंगाणा घालेन, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला होता. मात्र जरांगे यांच्या इशाऱ्यानंतरही संजय जाधव यांनी कार्यक्रम घेतला आणि या कार्यक्रमात भाषण करताना जरांगे यांची जाहीर माफीही मागितली.
“परभणीचा कार्यक्रम मागील दोन महिन्यांपासून ठरला होता. अगोदरच एक वेळेस हा कार्यक्रम रद्द झाला होता. आज हा कार्यक्रम ११ वाजता होता आणि ११ वाजताच मनोज जरांगे पाटील यांचा फोन आला की आपण हा कार्यक्रम रद्द करावा. मी त्यांना म्हणालो की, साहेब मी तुमचाच आहे. पण हा कार्यक्रम ११ वाजताच आहे. सर्व कार्यकर्ते जमा झालेले आहेत. आपण थोडं आधी म्हणाला असता तर कार्यक्रम रद्द देखील करता आला असता. पण हा कार्यक्रम यापूर्वी देखील एकदा रद्द झाला आहे आणि आता सर्व तयारी झाली आहे. कार्यकर्ते देखील सभास्थळी दाखल झाले आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करता येणे शक्य नाही. आजपर्यंत तुम्ही मला हाक दिलीत आणि मी प्रत्येक वेळेस तुमच्या हाकेला धावून आलो आहे. यापुढे देखील आपण मला कधीही बोलवा, मी तुमचाच आहे मी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील काही वेगळे नाहीत. त्यामुळे माझ्याविषयी गैरसमज बाळगू नये. मला माफ करा,” असं खासदार संजय जाधव यांनी मनोज जरांगेंना उद्देशून म्हटलं आहे.
यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री जयस्वाल, आमदार हिकमत उढाण, आमदार सईद खान यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना खासदार संजय जाधव म्हणाले की, “परभणी जिल्हा हा अविकसित जिल्हा आहे. या जिल्ह्यामधील शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात करत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नाही. त्याचबरोबर जिल्ह्यातील बराच भाग हा ओलीताखाली नाही. त्यासाठी देखील राज्य सरकारने ठोस पावले उचलावीत. त्याचबरोबर परभणी शहरामध्ये जी एमआयडीसी आहे त्या एमआयडीसीमध्ये कसल्याही प्रकारचे उद्योग नाहीत. त्यामुळे नवीन एमआयडीसी स्थापन करून परभणी शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग आणण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत जेणेकरून जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळेल आणि पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन नोकरी शोधावी लागणार नाही. परभणी शहरात क्रीडा संकुलासाठी देखील कृषी विद्यापीठाची जागा मंजूर करण्यात आली आहे. पण त्यावर देखील आतापर्यंत कसल्याही प्रकारची कारवाई झाली नाही,” असं म्हणत संजय जाधव यांनी परभणी जिल्ह्याचे प्रश्न एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडले.
दरम्यान,परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे असं म्हणत खासदार संजय जाधव म्हणाले की, धनुष्यबाण हे चिन्ह परंभणी जिल्ह्याने शिवसेनेला दिलेले आहेत. आजपर्यंत परभणी जिल्ह्यामध्ये धनुष्यबाणावरच आमदार- खासदार निवडून आले. फक्त एक वेळेचा अपवाद होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वसामान्यांची जाण आहे. ते स्वतः शेतकरी कुटुंबातून पुढे आल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना माहीत आहेत आणि ते दानशूर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे गोरगरिबांचे प्रश्न ते सोडवू शकतात,” अशा शब्दांत खासदार संजय जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा