Headlines

Sanjay Ghadi angry with Ashwini Bhide for rejecting Deputy Mayor Bungalow request; राणीच्या बागेतील रिकामा बंगला द्या, उपमहापौरांची मागणी धुडकावली, संजय घाडींची अश्विनी भिडेंवर नाराजी


Mumbai Deputy Mayor Bungalow : उपमहापौरांनी महापालिकेच्या शहर भागातील अन्य बंगल्यांची चाचपणी सुरू केली असून आपल्या मागणीची साधी दखलच घेतली नसल्याने त्यांनी आयुक्तांविरोधात पुन्हा एकदा उघडपणे नाराजी व्यक्त केली.

Sanjay Ghadi Ashwini Bhide Maharashtra Times (1)
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : भायखळा येथील राणीची बाग परिसरातील अतिरिक्त आयुक्तांचा रिकामा बंगला आपल्याला देण्याचा आग्रह उपमहापौर संजय घाडी यांनी धरला असला, तरी त्यांची ही मागणी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी अमान्य केली आहे.

आयुक्तांविरोधात उघड नाराजी

राणीची बाग परिसरातील बंगला महापालिका अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांना देण्यात आला आहे. त्यामुळे उपमहापौरांनी महापालिकेच्या शहर भागातील अन्य बंगल्यांची चाचपणी सुरू केली आहे. मागणीची साधी दखलच घेतली नसल्याने त्यांनी आयुक्तांविरोधात पुन्हा एकदा उघडपणे नाराजी व्यक्त केली.
Maharashtra TimesKalyan Crime : चल आम्ही तयार आहोत समलिंगी संबंधांना! रमेशला जंगलात बोलावलं, राजेश-प्रथमेशचा वेगळाच गेम, कल्याणमधील खुनाचा उलगडा
मुंबई महापालिकेतील महापौरांचा बंगला हा भायखळ्यातील राणीच्या बागेत आहे. महापौर रितू तावडे यांनी बंगल्यात प्रवेशही केला आहे. या बंगल्याच्या लगतच महापालिका अतिरिक्त आयुक्त यांचे सेवानिवासस्थान असलेला बंगला आहे. हा बंगला मिळवण्यासाठी संजय घाडी प्रयत्नशील आहेत.

राज ठाकरेंच्या मनसेचं मुंबईत आंदोलन; सरकारविरोधात निदर्शने

उपमहापौरांची पत्रातून मागणी आयुक्तांकडून अमान्य

यासंदर्भात त्यांनी अश्विनी भिडे यांना २५ जून रोजी पत्रही दिले. ‘मी दहिसर पूर्वेला राहत असल्याने दहिसर येथून मुंबई महापालिका मुख्यालय येथे दररोज ये-जा करताना प्रवासात बराच वेळ जातो. वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे मुख्यालयात वेळेत पोहोचणे शक्य होत नाही,’ असे त्यांनी पत्रात नमूद केले होते, मात्र या बंगल्याची उपमहापौरांची मागणी पालिका आयुक्तांनी अमान्य केली आहे.
Maharashtra TimesDivija Fadnavis : सोशल मीडिया ट्रेण्डचं आंधळं समर्थन करु नका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या लेकीची CJP आंदोलनावर पहिली प्रतिक्रिया

भायखळ्यातील तिन्ही बंगले आधीच बूक

राणीच्या बागेतील हा बंगला मिळावा, यासाठी महापालिका अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनीही अर्ज केला होता. त्यामुळे हा बंगला ढाकणे यांना देण्यात आला. भायखळा येथे एकूण तीन बंगले आहेत. एक बंगला महापौर यांना, दुसरा बंगला अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांना देण्यात आला. तिसऱ्या बंगल्यात या आधीच आरोग्य विभागाचे उपसंचालक राहत आहेत. त्यामुळे उपमहापौरांना बंगला मिळण्याची आशा धूसर झाली आहे. महापालिकेच्या जल विभागाचे आणखी तीन बंगले मलबार हिल, वरळी येथे आहेत. उपमहापौर त्यांची चाचपणी प्रशासनामार्फत करत आहेत.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा