सांगली : सांगली जिल्हा परिषदेत जवळपास सत्ता परिवर्तन झालेलं बघायला मिळत आहे. भाजपप्रणित महायुतीला सत्तेपासून रोखण्यात महाविकास आघाडीला यश मिळालेलं आहे. जिल्हा परिषदेमध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत मिळू शकले नसले तरी महाविकास आघाडी ही सत्तेच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा सांगली जिल्हा परिषदेतला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 61 पैकी 18 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर भाजपा हा 16 जागांवर विजय मिळवत नंबर दोनचा पक्ष ठरला आहे.
सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसला 11 जागांवर विजय मिळाला आहे. जिल्हा परिषदेतील सत्ता भाजपच्या हातातून जवळपास निसटली आहे. 31 ही सत्तेची मॅजिक फिगर असून राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार आणि काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मिळून 30 जागा निवडून आल्या आहेत. या ठिकाणी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेऊन महाविकास आघाडी सत्ता स्थापन करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
सांगली जिल्हा परिषद गट 61 पैकी 61 जागांचे निकाल
भाजपा – 16
राष्ट्रवादी अजित पवार – 06
शिंदेसेना – 07
काँग्रेस – 11
राष्ट्रवादी शरद पवार – 18
शिवसेना ठाकरे पक्ष – 01
रयत क्रांती संघटना – 01
जनसुराज्य शक्ती पक्ष – 01
सांगली जिल्ह्यातील दहा पंचायत समितीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा?
10 पंचायत समिती साठी – 122 गण
भाजप – 34
राष्ट्रवादी अजित पवार – 19
राष्ट्रवादी शरद पवार – 28
शिवसेना शिंदे – 19
काँग्रेस – 21
शिवसेना ठाकरे – 00
अपक्ष – 1 (शरद पवारांची राष्ट्रवादी पुरस्कृत)
सांगली जिल्हा पंचायत समितीवर सत्ता
1) वाळवा – राष्ट्रवादी शरद पवार
2 ) शिराळा – दोन्ही राष्ट्रवादी एकत्र सत्ता
3) तासगाव – राष्ट्रवादी अजित पवार घड्याळ
4 ) कवठेमहांकाळ – राष्ट्रवादी शरद पवार गट
5) जत – भाजप
6) आटपाडी – शिवसेना
7) मिरज – भाजप
8) खानापूर- शिवसेना शिंदे
9) कडेगाव – काँग्रेस
10) पलुस – काँग्रेस
सांगली जिल्हा 10 पंचायत समिती
भाजप – 2 काँग्रेस – 2 राष्ट्रवादी अजित पवार -1 राष्ट्रवादी श.प – 2 शिवसेना शिंदे -2 दोन्ही राष्ट्रवादी आघाडी – 1 (शिराळा येथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र सत्ता स्थापन करणार )
सांगली जिल्हा परिषद तालुका निहाय निकाल
जत तालुका 9 जिल्हा परिषद गट पैकी 8 जागा भाजपा जत तालुक्यातील 8 जिल्हा परिषद गटावर भाजपाची बाजी भाजप – 08 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार 01
वाळवा जिल्हा परिषद 11 पैकी 7 गट राष्ट्रवादी शरद पवार पक्ष
राष्ट्रवादी शरद पवार 07
शिवसेना ठाकरे पक्ष 01
भाजपा 01
रयत क्रांती 01
शिंदे सेना – 01
तासगाव जिल्हा परिषद 6 पैकी तिन्ही राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे
राष्ट्रवादी शरद पवार – 04
भाजपा – 00
राष्ट्रवादी अजित पवार – 01
काँग्रेस – 01
आटपाडी जिल्हा परिषद जागा
भाजपा – 01
राष्ट्रवादी अजित पवार – 01
शिंदेसेना – 02
खानापूर तालुका जिल्हा परिषद गट 4 पैकी चारही जागा शिंदेसेनेला
शिवसेना शिंदे – 04
भाजपा – 00
शिराळा जिल्हा परिषद 4 गट
जनसुराज्य शक्ती पक्ष 01
राष्ट्रवादी शरद पवार 02
राष्ट्रवादी अजित पवार – 01
कडेगाव जिल्हा परिषद 4 गट
काँग्रेस – 04
भाजपा – 00
पलूस जिल्हा परिषद 04 गट
काँग्रेस – 04
भाजप – 00
कवठेमहांकाळ जिल्हा परिषद गट 04
राष्ट्रवादी शरद पवार 03
राष्ट्रवादी अजित पवार 01
मिरज जिल्हा परिषद
भाजप 06
काँग्रेस 02
राष्ट्रवादी शरद पवार – 02
राष्ट्रवादी अजित पवार 01
सांगली जिल्हा 10 पंचायत समिती फायनल निकाल खालील प्रमाणे:
1) सांगली – मिरज पंचायत समिती – फायनल निकाल 22/22 गण भाजपा – 10 राष्ट्रवादी अजित पवार – 03 शिवसेना शिंदे – 02 काँग्रेस – 03 राष्ट्रवादी शरद पवार – 04 शिवसेना ठाकरे गट – 00
2)सांगली – वाळवा पंचायत समिती – फायनल निकाल 22/22 गण भाजपा – 04 राष्ट्रवादी अजित पवार – 00 शिवसेना शिंदे – 04 काँग्रेस – 00 राष्ट्रवादी शरद पवार – 14 शिवसेना ठाकरे गट – 00
3)सांगली – जत पंचायत समिती फायनल निकाल 18/18 गण भाजपा – 12 राष्ट्रवादी अजित पवार – 02 शिवसेना शिंदे – 00. काँग्रेस – 04 राष्ट्रवादी शरद पवार – 00 शिवसेना ठाकरे गट – 00
4)सांगली -शिराळा पंचायत समिती – फायनल निकाल 08/08 गण भाजपा – 02 राष्ट्रवादी अजित पवार – 03 शिवसेना शिंदे – 00 काँग्रेस – 00 राष्ट्रवादी शरद पवार – 02 शिवसेना ठाकरे गट – 00 अपक्ष – 01 ( राष्ट्रवादी शरद पवार गट पुरस्कृत)
5)सांगली – कडेगाव पंचायत समिती – फायनल निकाल 08/08 गण
भाजपा – 01 राष्ट्रवादी अजित पवार – 00 शिवसेना शिंदे – 00 काँग्रेस – 07 राष्ट्रवादी शरद पवार – 00 शिवसेना ठाकरे गट – 00
6)सांगली – तासगाव पंचायत समिती – फायनल निकाल 12/12 गण
भाजपा – 01 राष्ट्रवादी अजित पवार – 08 शिवसेना शिंदे – 00 काँग्रेस – 00 राष्ट्रवादी शरद पवार – 03 शिवसेना ठाकरे गट – 00
7) सांगली – खानापूर पंचायत समिती – फायनल निकाल 08/08 गण
भाजपा – 00 राष्ट्रवादी अजित पवार – 00 शिवसेना शिंदे – 08 काँग्रेस – 00 राष्ट्रवादी शरद पवार – 00 शिवसेना ठाकरे गट – 00
8)सांगली – कवठेमहांकाळ पंचायत समिती – फायनल निकाल 08/08 गण
भाजपा – 00 राष्ट्रवादी अजित पवार – 03 शिवसेना शिंदे – 00 काँग्रेस – 00 राष्ट्रवादी शरद पवार – 05 शिवसेना ठाकरे गट – 00
9)सांगली – आटपाडी पंचायत समिती – फायनल निकाल 08/08 गण
भाजपा – 03 राष्ट्रवादी अजित पवार – 00 शिवसेना शिंदे – 05 काँग्रेस – 00 राष्ट्रवादी शरद पवार – 00 शिवसेना ठाकरे गट – 00
10) सांगली – पलूस पंचायत समिती – फायनल निकाल 08/08 गण
भाजपा – 01 राष्ट्रवादी अजित पवार – 00 शिवसेना शिंदे – 00 काँग्रेस – 07 राष्ट्रवादी शरद पवार – 00 शिवसेना ठाकरे गट – 00
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा