Headlines

Sangli Student Death; स्वप्नांच्या उंबरठ्यावरच आयुष्याची अखेर; उमलत्या वयातील आदित्य शाळेच्या जलतरण तलावात बुडाला, दुर्घटनेने हळहळ


सांगलीतील आप्पासाहेब बिरनाळे निवासी शाळेच्या जलतरण तलावात बुडून आदित्य ओलेकर या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पालकांनी शाळा व्यवस्थापनावर गंभीर आरोप करत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, शाळेकडूनही याप्रकणावर खुलासा आला आहे.

Sangli Student Death, Appasaheb Birnale School
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : सांगलीच्या आप्पासाहेब बिरनाळे निवासी शाळेतील जलतरण तलावात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आदित्य विकास ओलेकर असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. आदित्य हा कवठेमंकाळ तालुक्यातील कोकळे गावचा रहिवासी होता. त्याला शिक्षणासाठी आप्पासाहेब बिरनाळे निवासी शाळेत दाखल करण्यात आले होते. शनिवारी दुपारी तो निवासी शाळेच्या जलतरण तलावात पोहण्यासाठी गेला असता ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

शाळा व्यवस्थापनावर आरोप

या घटनेनंतर आदित्यच्या पालकांनी आणि नातेवाईकांनी शाळा व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. आदित्यला पोहता येत नसतानाही त्याला जलतरण तलावात पाठविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच या प्रकरणात जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

शाळेकडून खुलासा

दरम्यान, आप्पासाहेब बिरनाळे निवासी शाळेकडूनही या घटनेबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. शाळेच्या म्हणण्यानुसार, शनिवारी दुपारी सर्व विद्यार्थ्यांना पोहण्यासाठी जलतरण तलावात आणण्यात आले होते. पोहण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकांनी आदित्यला पोहता येते का, अशी विचारणा केल्यानंतर त्याला तलावात जाण्याची परवानगी देण्यात आली होती. तसेच आदित्य आणि त्याचे मित्र जलतरण तलावात पोहत असताना ही दुर्घटना घडल्याचे शाळा प्रशासनाने म्हटले आहे.

Maharashtra TimesDomestic LPG Price Hike: दोन वेळच्या जेवणाचं गणित बिघडलं! गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ, किती रुपये मोजावे लागणार?

पोलिसांचा तपास सुरू

या घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आदित्यचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली, तरी नातेवाईकांनी काही शंका उपस्थित केल्या आहेत. त्या अनुषंगाने सर्व बाबींची पडताळणी करून आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, या घटनेनंतर आदित्यच्या कुटुंबीयांमध्ये आणि गावात शोककळा पसरली आहे. तसेच निवासी शाळांमधील जलतरण तलावांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, संबंधित शिक्षकांची चौकशी आणि घटनास्थळाची पाहणी करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा