Headlines

sangli crime Young man killed in Walwa over old dispute ; जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी आधी दारू पाजली, तरुण नशेत गेल्यावर निर्घृणपणे संपवलं, सांगलीत भयानक घटना


सांगलीच्या वाळवा येथे जुन्या वादातून ३० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बदला घेण्यासाठी आधी तरुणाला दारू पाजून नशेत नेलं, त्यानंतर डोक्यात दगड घालून निर्घृणपणे तरुणाला संपवले. आष्टा पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Young man killed in Walwa over old dispute
सांगलीच्या वाळव्यात जुन्या भांडणातून तरुणाचा निर्घृण खून
स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : जुन्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी एका ३० वर्षीय तरुणाला घरात बोलावून, त्याला दारू पाजून आणि त्यानंतर डोक्यात दगड व काठीने प्रहार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना वाळवा येथे घडली आहे. या भीषण घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत. याप्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण जिल्ह्यात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

जुना वादावरुन घटना

संदेश उर्फ साहिल अशोक कदम (वय ३०, रा. वाळवा, माळभाग) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील अशोक भीमराव कदम (वय ६०) यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदेश कदम आणि संशयित आरोपींमध्ये गेल्या काही दिवसांपासून जुन्या कारणावरून वाद सुरू होता. आज २९ मार्च रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास, वाळवा ते आहेरवाडी रोडवरील रॉयल हॉटेलजवळ राहणाऱ्या राजश्री आमसिद्ध कोळी हिच्या घरी संशयितांनी संदेशला बोलावून घेतले.

नशेत असताना हल्ला

प्रथमेश उर्फ बबलू आमसिद्ध कोळी, अभिजीत उर्फ सोन्या टूमक्या परीट आणि राजश्री कोळी या तिघांनी संगनमत करून संदेशला प्रथम दारू पाजली. तो नशेत असतानाच पूर्ववैमनस्यातून त्याच्यावर हल्ला चढवण्यात आला.

Maharashtra TimesPune Crime : पुणे विमानतळावर 26.80 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त, सीमाशुल्क विभागाची कारवाई; संत्र्याच्या खोक्यातून चालू होती तस्करी

आरोपींनी काठीने आणि दगडाने संदेशच्या डोक्यावर व तोंडावर बेदम मारहाण करत त्याचा अत्यंत क्रूरपणे खून केला. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह घरापासून काही अंतरावर नेऊनटाकण्यात आला.

गुन्हा दाखल

घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय अधिकारी अरुण पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. आष्टा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप शितोळे या प्रकरणाचा अधिक तपास करत असून संशयितांचा शोध सुरू आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा