![]()
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गाजलेल्या ‘आदर्श नागरिक सहकारी पतसंस्था’ घोटाळ्यातील पीडित ठेवीदार आज पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. आपल्या हक्काचे पैसे परत मिळावेत या मागणीसाठी आज माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात शेकडो ठेवीदारांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत तीव्र आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभं राहून शासनाचा निषेध करत ‘थाळी वाजवा’ आंदोलन सुरू केल्याने परिसर दणाणून गेला आहे.
Source link
Sambhajinagar Morcha | 202 कोटींचा घोटाळा,३२ हजार कुटूंब संकटात! | Adarsh Patsanstha Scam
