Headlines

Salman Khan : सरकारच्या मदतीला धावला भाईजान! मोदींनी शब्द दिलाय, आता माघार घ्या; वांगचुक यांना आवाहन करत जेवण ऑफर


Salman Khan Post : सलमान खाननं काल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. मात्र, आता अभिनेत्यानं पुन्हा एक पोस्ट शेअर करत विद्यार्थ्यांना आंदोलन थांबवण्याची विनंती केली आहे.

Salman Khan Post On CJP Protest And Sonam Wangchuk
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – सुपरस्टार सलमान खाननं नुकतेच आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज झाल्याप्रकरणी दुःख व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली. अभिनेत्यानं विद्यार्थ्यांचं कौतुक केलेलं. मात्र आता, या अभिनेत्यानं पुन्हा पोस्ट शेअर करत विद्यार्थ्यांना घरी परतण्याचं आणि आंदोलन संपवण्याचं आवाहन केलं आहे. त्यानं सोनम वांगचुक यांनाही उपोषण संपवण्याचं आवाहन केलं आहे.

सलमान खानची पोस्ट

सलमानने असंही म्हटलं आहे की, शिक्षण आणि सुरक्षेच्या बाबतीत विद्यार्थी हे पहिलं प्राधान्य आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी दोषी असलेल्या लोकांवर कारवाई करतील अशी आशा आहे. सलमानची पोस्ट सध्या चर्चेत आहे. सलमान खानने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिलं की, ‘शैक्षणिक आणि सुरक्षेच्या दृष्टीनं विद्यार्थी सर्वोच्च प्राधान्यावर आहेत, त्यामुळे त्यांनी काळजी करण्याची किंवा त्यांनी आपापल्या पालकांना काळजी करायला लावण्याची गरज नाही. माननीय पंतप्रधानांनी शब्द दिला आहे, आणि मला खात्री आहे की, या पेपरफुटीसाठी जबाबदार असलेल्या सर्व लोकांवर ते कठोर कारवाई करतील. म्हणून विद्यार्थ्यांनो, कृपया आपापल्या पालकांकडे आणि घरी परत जा.’

सोनम वांगचुक यांना अभिनेत्याचं आवाहन

‘सोनम वांगचुक, बास झालं भावा. विषय आणखी ताणू नका. पुढे गरज पडल्यास हा उत्साह टिकवून ठेवा. त्याची मला गरज वाटत नाही आणि काहीतरी खा. तुम्हाला हवं असेल तर मी माझ्या घरून जेवण पाठवतो’ असंही सलमान खानने शेवटी म्हटलं आहे.

CJP Protest | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर राजकीय नेते दिल्लीत, जंतर-मंतरवर आतापर्यंत काय घडलं?

सलमान खाननं काल सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलेलं की, ‘हे अत्यंत शांततापूर्ण आंदोलन होतं. पण त्याला हिंसक रूप मिळालं, हे पाहून अत्यंत वाईट वाटलं. या हिंसाचारात जखमी झालेले विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबांप्रति मला वाईट वाटतंय. पण, आपल्या देशातील तरुण पिढी एका चांगल्या शिक्षण व्यवस्थेसाठी एकत्र आली आणि पालकांनीही त्यांना पाठिंबा दिला, हे पाहून आनंद वाटला. विद्यार्थ्यांचं हे पाऊल अतिशय धाडसी होतं. ही पिढी नक्कीच देशाचं नाव मोठं करेल.’

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा