Headlines

Sachin Ahir | मोठी बातमी! सचिन अहिर बिनविरोध उपसभापती; फडणवीसांचे खास भाष्य चर्चेत


मुंबई – : शिवसेना ठाकरे गटाला धक्का देत आमदार सचिन अहिर यांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून विधानपरिषद उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानतंर, आज त्यांची उपसभापतीपदी निवड झाली.सुरुवातीला महाविकास आघाडीकडून ज. मो. अभ्यंकर यांची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, सभागृहाची परंपरा कायम राखत विरोधकांनी आपला प्रस्ताव मागे घेतल्याने सचिन अहिर यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तसेच विविध पक्षांच्या नेत्यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिर या शब्दाचा अर्थ सांगितला…

काय म्हणाले

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिन अहिर यांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत त्यांच्या कामकाजाचे कौतुक केले. १९९९ पासूनचा सहवास सांगताना त्यांनी ‘अहिर’ या शब्दाचा अर्थ गोपालक आणि निर्भीड असा असल्याचे नमूद करत, सचिन अहिर हे संयमी, अभ्यासू आणि निर्भीडपणे काम करणारे नेतृत्व असल्याचे गौरवोद्गार काढले



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत