Headlines

Rooh Afza Success Story; रस्त्याच्या कडेला सुरुवात, फाळणीत दोन भाऊ वेगळे झाले; याच्यासमोर रसना, ग्लुकोजही फिके! ‘लाल’ सरबतच्या जन्माची कहाणी

80th Independence Day Success Story: जुन्या दिल्लीच्या रस्त्याच्या बाजूला उगम पावलेल्या या सॉर्बेटचा मोठा इतिहास आहे. या ब्रँडने भारत-पाकिस्तान फाळणीचे दुःख सोसले आणि अनेक आव्हानांचा सामना केला, तरीही रुह अफझाची चव 80 वर्षांत तशीच टिकून राहिली आहे.

Rooh Afza Success Story
याच्यासमोर रसना, ग्लुकोजही फिके! ‘लाल’ सरबतच्या जन्माची कहाणी
Success Story: साल 1907… जुन्या दिल्लीतील च्या रस्त्यांवर उन्हाळ्याच्या दिवसांत आजच्यासारखे फ्रीज, थंड पाणी आणि पॅकेज केलेले शीतपेये प्रत्येक घरात सहज मिळायची नाही. दिल्लीची भयानक उष्णता आणि उष्णतेच्या लाटा रहिवाशांसाठी मोठं आव्हान असयचं.युनानी वैद्य हाफिज अब्दुल मजीद यांनी ही समस्या ओळखली आणि उन्हाळ्याच्या उष्णतेत थंड गारवा मिळेल असं पेय बनवलं. अनेक घटक मिसळून त्यांनी अनोखे लाल रंगाचे सरबत तयार केले, ज्याची चव आजही 100 वर्षांनंतरही तशीच राहिली आहे.

रुह अफझाची कहाणी

रुह अफझाची कहाणी

रुह अफझा केवळ नाव ऐकताच मनात विलक्षण भावना दाटून येते. एक काळ होता जेव्हा या शीत पेयालासौंदर्याचे प्रतीक मानले जायचे. या लाल सरबताने स्वातंत्र्याचा उदय आणि तीन देशांची फाळणी पाहिली. जुन्या दिल्लीच्या रस्त्यांवरून सुरू झालेला हा प्रवास केवळ अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशपर्यंत पोहोचला नाही तर, जगभरही याचे चाहते आहेत. रमजानच्या काळात रुह अफझाशिवाय इफ्तार अपूर्ण मानला जातो.

रूह अफझामध्ये फुलं, फळं, भाज्या, आणि औषधी वनस्पतींचे अर्क वापरले गेले. पाककृतीमध्ये खस, गुलाब, केवडा (वसंत ऋतूतील पाने), पुदिना, कोथिंबीर, गाजर, पालक, सफरचंद आणि संत्री यांसारख्या घटकांचा समावेश करून एक सरबत बनवलं ज्याला ‘रुह अफझा’ नाव दिलं. ‘रुह अफझा’ म्हणजे ‘आत्मा ताजातवाना करणारे’ असा होतो. सुरुवातीला सरबत 100 वर्षांहून अधिक काळ लोकांच्या जीवनाचा एक भाग राहील याची कोणी कल्पनाही केली नसेल.

पहिली बाटली आजच्यासारखी नव्हती

पहिली बाटली आजच्यासारखी नव्हती

आजच्या काळात जेव्हा एखादे नवीन उत्पादन बाजारात आणले जाते, तेव्हा त्याची आकर्षक बाटली, डिझाइन आणि पॅकेजिंग तयार केले जाते. पण 1907 साली रुह अफझाच्या सुरुवातीच्या काळात नवीन काचेच्या बाटल्या सहज मिळायच्या नाही. त्यामुळे जुन्या बाटल्या स्वच्छ करून त्यात सिरप भरले जायचे. मात्र, बाटलीला इतरांपेक्षा वेगळं ओळखण्यसाठी कलाकार मिर्झा नूर अहमद यांनी वैशिष्ट्यपूर्ण लेबल तयार केले.त्यांनी रुह अफझासाठी फुले आणि पानांची चित्रे असलेले रंगीबेरंगी लेबल डिझाइन केले, त्यामुळे रुह अफझाची बाटली दुरूनही सहज ओळखता यायची.

व्यवसायाला कुटुंबाची जोड

व्यवसायाला कुटुंबाची जोड

रुह अफझा हळूहळू लोकांमध्ये लोकप्रिय होऊ लागलं आणि या शीत पेयासोबत हकीम अब्दुल मजीद यांनीही हमदर्द व्यवसायाचा विस्तार केला. पण 1915 मध्ये हकीम अब्दुल मजीद यांचे निधन झाले आणि त्यावेळी, त्यांची पत्नी, राबिया बेगम आणि दोन मुलांनी व्यवसायाची सूत्रे हाती घेतली. मुलगे – हकीम अब्दुल हमीद आणि हकीम मोहम्मद सईद – पुढे कुटुंबाचे पोट भरण्यासाठी आणि व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. दोघांच्या मेहतनतीने व्यवसाय भरभराटीला आला आणि रुह अफझाची प्रतिष्ठाही अधिक मजबूत झाली.

मग फाळणीने आयुष्य बदललं

मग फाळणीने आयुष्य बदललं

मग तो काळ आला जेव्हा एका देशाची विभागणी झाली आणि यासोबतच रूह अफझाही विभागले गेले. 1947 मध्ये केवळ देश किंवा जमीन विभागली गेली नाही तर, लाखो कुटुंबांचे जीवन पूर्णपणे बदलले. हकीम अब्दुल हमीद भारतातच राहिले आणि इथे त्यांनी हमदर्दचा व्यवसाय वाढवणे सुरू ठेवले तर, त्यांचे भाऊ – हकीम मोहम्मद सईद – पाकिस्तानात गेले आणि कराचीमध्ये नव्याने सुरुवात केली.

रुह अफझासमोरील आव्हान

रुह अफझासमोरील आव्हान

एका वैद्य कुटुंबाने सुरू केलेल्या या सरबताने गेल्या 100 पेक्षा जास्त वर्षांत अनेक चढ-उतार पाहिले. फाळणीचा विध्वंस, असंख्य युद्धे पहिलीच पण त्यासोबाबत परदेशी कंपन्यांकडून आणि रसना व ग्लुकोज यासारख्या देशांतर्गत कंपन्यांकडूनही आव्हानांचा सामना करावा लागला. या ब्रँडची नक्कल केल्याबद्दल खटल्यांनाही सामोरे जावे लागले, पण इतक्या वर्षांत या रसाची चव अजिबात बदलली नाही. आजही रुह अफझा तोच थंडावा आणि ताजेपणा देतो, जो 117 वर्षांपूर्वी द्यायचा.

रुह अफझा केवळ व्यवसाय नाही

रुह अफझा केवळ व्यवसाय नाही

भारतातील रुह अफझाच्या प्रवासामागील महत्त्वाचा पैलू म्हणजे की हकीम अब्दुल हमीद यांनी हमदर्दला केवळ एक खाजगी, नफ्यावर चालणारा व्यवसाय म्हणून ठेवले नाही. 1948 मध्ये त्यांनी वक्फ मॉडेलमध्ये रूपांतर केले. म्हणजे व्यवसायाचे उत्पन्न केवळ मालकाच्या वैयक्तिक फायद्यासाठीच नाही तर शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवा यांसारख्या कार्यांसाठीही वापरले जाणार होते. याच विचारातून हमदर्दशी संबंधित अनेक संस्था आणि समाजकार्य भरभराटीस आले.

जामिया हमदर्द याच वारशाचे एक उत्तम उदाहरण आहे, जे देशातील सर्वात मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांपैकी आहे. म्हणजे, रुह अफझाच्या बाटल्यांमधून मिळणाऱ्या महसुलाचा काही भाग व्यवसायापलीकडे समाजावर परिणाम करणाऱ्या उपक्रमांसाठीही वापरला जातो.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा