80th Independence Day Success Story: जुन्या दिल्लीच्या रस्त्याच्या बाजूला उगम पावलेल्या या सॉर्बेटचा मोठा इतिहास आहे. या ब्रँडने भारत-पाकिस्तान फाळणीचे दुःख सोसले आणि अनेक आव्हानांचा सामना केला, तरीही रुह अफझाची चव 80 वर्षांत तशीच टिकून राहिली आहे.

रुह अफझाची कहाणी
रुह अफझा केवळ नाव ऐकताच मनात विलक्षण भावना दाटून येते. एक काळ होता जेव्हा या शीत पेयालासौंदर्याचे प्रतीक मानले जायचे. या लाल सरबताने स्वातंत्र्याचा उदय आणि तीन देशांची फाळणी पाहिली. जुन्या दिल्लीच्या रस्त्यांवरून सुरू झालेला हा प्रवास केवळ अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशपर्यंत पोहोचला नाही तर, जगभरही याचे चाहते आहेत. रमजानच्या काळात रुह अफझाशिवाय इफ्तार अपूर्ण मानला जातो.
रूह अफझामध्ये फुलं, फळं, भाज्या, आणि औषधी वनस्पतींचे अर्क वापरले गेले. पाककृतीमध्ये खस, गुलाब, केवडा (वसंत ऋतूतील पाने), पुदिना, कोथिंबीर, गाजर, पालक, सफरचंद आणि संत्री यांसारख्या घटकांचा समावेश करून एक सरबत बनवलं ज्याला ‘रुह अफझा’ नाव दिलं. ‘रुह अफझा’ म्हणजे ‘आत्मा ताजातवाना करणारे’ असा होतो. सुरुवातीला सरबत 100 वर्षांहून अधिक काळ लोकांच्या जीवनाचा एक भाग राहील याची कोणी कल्पनाही केली नसेल.
पहिली बाटली आजच्यासारखी नव्हती
आजच्या काळात जेव्हा एखादे नवीन उत्पादन बाजारात आणले जाते, तेव्हा त्याची आकर्षक बाटली, डिझाइन आणि पॅकेजिंग तयार केले जाते. पण 1907 साली रुह अफझाच्या सुरुवातीच्या काळात नवीन काचेच्या बाटल्या सहज मिळायच्या नाही. त्यामुळे जुन्या बाटल्या स्वच्छ करून त्यात सिरप भरले जायचे. मात्र, बाटलीला इतरांपेक्षा वेगळं ओळखण्यसाठी कलाकार मिर्झा नूर अहमद यांनी वैशिष्ट्यपूर्ण लेबल तयार केले.त्यांनी रुह अफझासाठी फुले आणि पानांची चित्रे असलेले रंगीबेरंगी लेबल डिझाइन केले, त्यामुळे रुह अफझाची बाटली दुरूनही सहज ओळखता यायची.
व्यवसायाला कुटुंबाची जोड
रुह अफझा हळूहळू लोकांमध्ये लोकप्रिय होऊ लागलं आणि या शीत पेयासोबत हकीम अब्दुल मजीद यांनीही हमदर्द व्यवसायाचा विस्तार केला. पण 1915 मध्ये हकीम अब्दुल मजीद यांचे निधन झाले आणि त्यावेळी, त्यांची पत्नी, राबिया बेगम आणि दोन मुलांनी व्यवसायाची सूत्रे हाती घेतली. मुलगे – हकीम अब्दुल हमीद आणि हकीम मोहम्मद सईद – पुढे कुटुंबाचे पोट भरण्यासाठी आणि व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. दोघांच्या मेहतनतीने व्यवसाय भरभराटीला आला आणि रुह अफझाची प्रतिष्ठाही अधिक मजबूत झाली.
मग फाळणीने आयुष्य बदललं
मग तो काळ आला जेव्हा एका देशाची विभागणी झाली आणि यासोबतच रूह अफझाही विभागले गेले. 1947 मध्ये केवळ देश किंवा जमीन विभागली गेली नाही तर, लाखो कुटुंबांचे जीवन पूर्णपणे बदलले. हकीम अब्दुल हमीद भारतातच राहिले आणि इथे त्यांनी हमदर्दचा व्यवसाय वाढवणे सुरू ठेवले तर, त्यांचे भाऊ – हकीम मोहम्मद सईद – पाकिस्तानात गेले आणि कराचीमध्ये नव्याने सुरुवात केली.
रुह अफझासमोरील आव्हान
एका वैद्य कुटुंबाने सुरू केलेल्या या सरबताने गेल्या 100 पेक्षा जास्त वर्षांत अनेक चढ-उतार पाहिले. फाळणीचा विध्वंस, असंख्य युद्धे पहिलीच पण त्यासोबाबत परदेशी कंपन्यांकडून आणि रसना व ग्लुकोज यासारख्या देशांतर्गत कंपन्यांकडूनही आव्हानांचा सामना करावा लागला. या ब्रँडची नक्कल केल्याबद्दल खटल्यांनाही सामोरे जावे लागले, पण इतक्या वर्षांत या रसाची चव अजिबात बदलली नाही. आजही रुह अफझा तोच थंडावा आणि ताजेपणा देतो, जो 117 वर्षांपूर्वी द्यायचा.
रुह अफझा केवळ व्यवसाय नाही
भारतातील रुह अफझाच्या प्रवासामागील महत्त्वाचा पैलू म्हणजे की हकीम अब्दुल हमीद यांनी हमदर्दला केवळ एक खाजगी, नफ्यावर चालणारा व्यवसाय म्हणून ठेवले नाही. 1948 मध्ये त्यांनी वक्फ मॉडेलमध्ये रूपांतर केले. म्हणजे व्यवसायाचे उत्पन्न केवळ मालकाच्या वैयक्तिक फायद्यासाठीच नाही तर शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवा यांसारख्या कार्यांसाठीही वापरले जाणार होते. याच विचारातून हमदर्दशी संबंधित अनेक संस्था आणि समाजकार्य भरभराटीस आले.
जामिया हमदर्द याच वारशाचे एक उत्तम उदाहरण आहे, जे देशातील सर्वात मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांपैकी आहे. म्हणजे, रुह अफझाच्या बाटल्यांमधून मिळणाऱ्या महसुलाचा काही भाग व्यवसायापलीकडे समाजावर परिणाम करणाऱ्या उपक्रमांसाठीही वापरला जातो.

