Headlines

rohit sharma new look ravi shastri shares photo with team india star in london; लंडनमध्ये रवी शास्त्रींना भेटला ‘क्लीन शेव्ह’ रोहित शर्मा! वेस्ट इंडिज मालिकेआधी हिटमॅनचा कूल अवतार व्हायरल


Rohit Sharma New Look : इंग्लंडविरुद्ध शतक झळकावल्यानंतर रोहित शर्मा सध्या लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. याचदरम्यान त्याने माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांची भेट घेतली असून, दोघांचा फोटो आणि रोहितचा नवा लूक चर्चेत आला आहे.

Rohit Sharma New Look
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत जोरदार फलंदाजी करून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देणारा भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा सध्या भलताच चर्चेत आहे. मालिका संपल्यानंतर रोहित सध्या लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तेथे त्याने भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची भेट घेतली. दोघांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

रवी शास्त्रींची खास पोस्ट

रवी शास्त्रींनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ अकाऊंटवरून रोहितसोबतचा हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत दोघेही खूप उत्साही दिसत आहेत. शास्त्रींनी रोहितच्या खांद्यावर हात ठेवला असून, दोघेही हसताना दिसत आहेत. फोटो शेअर करत शास्त्रींनी लिहिले, “लंडनमध्ये रिलॅक्स मूडमध्ये असलेल्या शर्माला भेटून खूप आनंद झाला.”

Maharashtra TimesAjinkya Rahane News : 20 वर्षांचा प्रवास, निवृत्तीआधीचा प्रसंग, अजिंक्यच्या पत्नीनं इमोशनल पोस्टमधून मन मोकळं केलं, प्रत्येक शब्द बोलका!

‘क्लीन शेव्ह’ लूकने वेधले लक्ष

या फोटोमध्ये सर्वांचे लक्ष रोहितच्या नव्या स्टायलिश लूकने वेधून घेतले. दाढी काढून ‘क्लीन शेव्ह’ केलेल्या अगदी वेगळ्याच अवतारात रोहित दिसला. त्याने पांढरी डिझाईन असलेला काळा हाफ शर्ट आणि काळी पॅन्ट घातली होती. रोहितचा हा नवा अंदाज चाहत्यांना खूपच आवडला आहे.

बॅटने दिले टीकाकारांना उत्तर

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांत रोहितने अनुक्रमे ११ आणि २६ धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याच्या फॉर्मवर टीका सुरू झाली होती. तो निवृत्ती घेणार अशा अफवा पसरल्या होत्या. लॉर्ड्सवरील सामना त्याचा शेवटचा सामना असेल असेही म्हटले जात होते. मात्र, बीसीसीआयचे सचिव देवाजित सैकीया यांनी या बातम्या फेटाळून लावल्या होत्या. रोहित भारतीय संघाच्या भविष्यातील योजनांचा महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

त्यानंतर लॉर्ड्सवरील सामन्यात रोहितने अवघ्या ११० चेंडूंत १३८ धावांची तडाखेबाज खेळी केली. या खेळीत त्याने १७ चौकार आणि ५ षटकार ठोकले. भारतीय संघाला सामना जिंकता आला नाही, तरीही आपण अजूनही मॅच विनर आहोत हेच रोहितने दाखवून दिले.

Maharashtra TimesAlzarri Joseph vs Daren Sammy : हेड कोच खोटं बोलतोय! वेस्ट इंडिज क्रिकेटमधील वाद चव्हाट्यावर, डॅरेन सॅमीला अल्झारीचा कडक रिप्लाय, नेमकं प्रकरण काय?

वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेतून पुनरागमनाची शक्यता

सध्या लंडनमध्ये विश्रांती घेत असलेला रोहित शर्मा सप्टेंबरच्या शेवटी वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून पुन्हा मैदानात उतरण्याची शक्यता आहे. २०२७ च्या वन-डे वर्ल्ड कपच्या दृष्टीने ही मालिका रोहितसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा