Headlines

Rohit Sharma : इंग्लंडला रोहित शर्मा फोडत होता, पण बॅट टीमबाहेर असलेल्या खेळाडूची होती; नेमकी कोणाची? – shardul thakur had given rohit the bat with which he scored a century against england at lords


Rohit Sharma News : इंग्लंडविरूद्ध रोहित शर्मा याने १३८ धावांची तुफानी खेळी केली. रोहितने १७ चौकार आणि ५ षटकारांची आतषबाजी केली. रोहितने यावेळी बॅटिंग करताना जी बॅट वापरली होती ती त्याला टीमबाहेर असलेल्या खेळाडूने दिली होती. नेमकी कोणी, जाणून घ्या.

Rohit Sharma
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : रोहित शर्माने शतक आणि शुभमन गिल, विराट कोहली यांनी अर्धशतक ठोकले खरे; पण ते भारताच्या विजयासाठी पुरेसे ठरले नाही. इंग्लंडने मालिकेतील तिसऱ्या वन-डे क्रिकेट सामन्यात भारतावर २७धावांनी मात केली. यासह इंग्लंडने तीन सामन्यांची मालिका २-१ने जिंकली. भारत हरला पण रोहित शर्मा याच्या शतकाने सर्व चाहते खूष झाले. सर्वांना हिटमॅनचा शो पाहायला मिळाला. पण तुम्हाला माहिती का या सामन्यामध्ये रोहित शर्माने वापरलेली बॅट त्याची नव्हती. ही बॅट त्याला टीमबाहेर असलेल्या खेळाडूने दिली होती. नेमका कोण होता तो खेळाडू? ज्याने रोहितला बॅट दिली जाणून घ्या.

रोहित शर्मा याने शतक केल्यावर त्यावेळी त्याने बॅट उंचावल्यावर बॅटच्या बॉटमला एका खेळाडूचे नाव लिहिल होते. हे नाव दुसऱ्या तिसऱ्या कोणत्या खेळाडूचे नसून शार्दुल ठाकूरचे होते. रोहितने शतक केले त्यावेळी शार्दुल कॉमेट्री करत होता. तो म्हणाला, मला भारतीय संघापासून मला कोणी दूर ठेऊ शकत नाही. शार्दुलने सांगितले की, माझे SS या कंपनीसोबत करार असून त्याचे मालक जतिन सरीन यांनी मला विलो लाकडाच्या बॅट पाठवल्या होत्या. रोहितला बॅट खूप आवडल्या त्याने मला एक बॅट मागितली. रोहितवर सगळेच प्रेम करतात त्यामुळे त्याला नकार द्यायचा प्रश्नच नाही, मला आनंद होतोय की, लॉर्ड्स सारख्या मैदानावर मी दिलेल्या बॅटने ऐतिहासिक शतक ठोकले, असं शार्दुल ठाकूर म्हणाला.
Maharashtra TimesFIFA World Cup Winner 2026 : विजेतेपदाचे स्वप्न भंगताच अर्जेंटिनाचा पारेडेस आक्रमक, स्पॅनिश खेळाडूंना मैदानातच भिडला, व्हिडिओ समोर
बेन डकेटचे शतक आणि जेकब बेथेल, जो रूटच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद ३८७ अशी विक्रमी धावसंख्या रचली. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला ७ बाद ३६० धावाच करता आल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित-गिलने २४.२ षटकांत १४७ धावांची भागीदारी रचली. गिलने ८४ चेंडूंत १० चौकार व एका षटकारासह ७७ धावा केल्या. यानंतर रोहितने विराट कोहलीच्या साथीने ८६ चेंडूंत ११३ वाढवला. धावा जोडून वेग रोहितने ११० चेंडूंत १७ चौकार व पाच षटकारांसह १३८ धावा केल्या. मात्र, ही जोडी फुटली आणि ईशान किशन, श्रेयस अय्यर झटपट माघारी परतले. त्यामुळे चेंडू आणि धावांतील अंतर वाढत गेले. कोहलीही बाद झाल्याने भारताच्या उरल्यासुरल्या आशाही मावळल्या. कोहलीने ६० चेंडूंत चार चौकार व तीन षटकारांसह ७४ धावा केल्या. Maharashtra TimesFIFA WC 2026 : फुटबॉल वर्ल्ड कप विजेत्यांना मिळणार स्पेशल ‘चॅम्पियनशिप रिंग’, चाहत्यांनाही तब्बल 1996 रिंग्स भेटणार, जाणून घ्या
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. फॉर्मात असलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांसमोर भारतीय गोलंदाजांची अनुभवाची कमतरता जाणवली. बेन डकेट आणि जेकब बेथेल यांनी ३०.१ षटकांत १९२ धावांची सलामी दिली. बेथेलला शतकापासून रोखण्यात प्रसिध कृष्णाला यश आले. डकेटने १३५ चेंडूंत १८ चौकार व १ षटकारासह १४१ धावा केल्या. यानंतर रूटने ४८ चेंडूंत नऊ चौकारांसह नाबाद ७४, तर बटलरने १३ चेंडूंत चार चौकार व तीन षटकारांसह नाबाद ४१ धावा केल्या.