Kiyosaki Latest Market Crash Prediction: ‘रिच डॅड, पुअर डॅड’चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा आपल्या ‘सर्वात मोठ्या मार्केट क्रॅश’चे भाकीत पुनरुच्चर केले आहे. कियोसाकी म्हणाले की, आगामी आर्थिक मंदी किंवा महामंदीमध्ये अमेरिकी बॉण्ड्स, स्टॉक्स, म्युच्युअल फंड आणि फियाट चलन (डॉलर, युरो) यांसारख्या विश्वासावर आधारित सर्व मालमत्ता पूर्णपणे नष्ट होतील.

X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अलीकडच्या पोस्टमध्ये कियोसाकीने ‘ज्या आर्थिक संकटाची आणि मंदीची भीती होती, ती आता आली आहे’, असा दावा केला. तसेच ‘आजचे श्रीमंत उद्या गरीब होतील,’ असा इशाराही कियोसाकीने दिला. ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या लेखकाने ज्याला एकेकाळी ‘इतिहासातील सर्वात मोठी शेअर बाजारातील घसरण’ म्हटले होते, तो आता दूरचा धोका राहिलेला नाही, असा इशारा दिला आणि म्हटले की इतिहासातील सर्वात मोठी घसरण आता अगदी जवळ आली आहे.
New EPF Scheme 2026: EPF विड्रॉलचे नवीन नियम; नोकरी सोडल्यानंतर 12 महिने वाट बघावी लागणार; कधी आणि किती वेळा पैसे काढता येणार?
‘The Entropy Trap’ या पुस्तकाचा संदर्भ
रॉबर्ट कियोसाकीने आपल्या पोस्टमध्ये ‘The Entropy Trap’ नावाच्या या पुस्तकाचा हवाला दिला संदर्भ देत विशिष्ट इशारा दिला. त्यांनी लिहिले आहे, “टिकून राहण्यासाठी ‘विश्वासावर’ अवलंबून असलेली कोणतीही मालमत्ता आगामी आर्थिक संकटात आणि संभाव्य महामंदीत पूर्णपणे नष्ट होईल.”
SBI Funds IPO: गुंतवणूकदार सज्ज व्हा! पुढील आठवड्यात येणार देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडाचा मेगा आयपीओ; पाहा डिटेल्स
कियोसाकी म्हणतात की, या श्रेणीत आजच्या काळात सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सर्व पारंपरिक गुंतवणूक साधनांचा समावेश असून या आर्थिक संकटात कोणकोणत्या गोष्टी असुरक्षित राहण्याची शक्यता आहे याबाबत स्पष्ट वक्तव्य केले.
- अमेरिकन सरकारी बॉण्ड्स आणि सरकारी सिक्युरिटीज
- काही स्टॉक्स, ईटीएफ आणि म्युच्युअल फंड
- निवृत्ती निधी जसे की 401k, IRA आणि सुपरॅन्युएशन
- सर्व फियाट चलन, ज्याला रॉबर्ट कियोसाकी ‘बनावट चलन’ म्हणतात, जसे की अमेरिकन डॉलर, युरो, येन आणि पेसो.
कियोसाकीने सांगितले आपल्या गुंतवणुकीचे सिक्रेट
याशिवाय, कियोसाकीने आपल्या पोस्टमध्ये आपल्या गुंतवुकीचे गुपितही उघड केले. त्यांनी म्हटले की, 1965 पासून आपण प्रामुख्याने अशा मालमत्तांमध्ये गुंतवणूक करत आहेत, ज्यांना कोणाच्याही ‘विश्वासाची’ गरज नसते. कियोसाकी म्हणतात की सोने, चांदी आणि कच्चे तेल केवळ याच तीनच खऱ्या आणि सुरक्षित मालमत्ता आहेत.
आपल्या पोस्टमध्ये शेवटी कियोसाकीने अत्यंत गंभीर शब्दांत म्हटले आहे की, “जसं की ‘The Entropy Trap’ पुस्तक इशारा देते आणि आणि मी अनेक वर्षांपासून सांगत आहे, ‘जे आज श्रीमंत आहेत ते उद्या गरीब होतील.’ माझा विश्वास आहे की ‘उद्या’ आधीच आले आहे, तो आज आहे.”
रॉबर्ट कियोसाकींचे पोस्ट तुम्ही फॉलो करत असाल तर तुमच्या लक्षात आले असेल की न्यूयॉर्क बेस्ट सेलरचे लेखक पारंपरिक बँकिंग प्रणाली आणि अमेरिकन डॉलरचे नेहमीच प्रखर टीकाकार राहिले आहेत. कियोसाकीचे अंदाज कधीकधी अतिआक्रमक किंवा भीतीदायक मानले जातात, पण जागतिक बाजारांमधील सध्याची अनिश्चितता पाहता, ‘कोणतीही विश्वासार्ह मालमत्ता (सोने आणि चांदी) नाही’ या त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

