Rickshaw driver from parbhani decorates home into a golden palace for daughters welcome; माझ्या मुलीत मला माझी आई दिसली; परभणीच्या रिक्षाचालकाने सजवला सोन्याचा महाल
Rickshaw driver from parbhani decorates home into a golden palace for daughters welcome; माझ्या मुलीत मला माझी आई दिसली; परभणीच्या रिक्षाचालकाने सजवला सोन्याचा महाल
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: दोन वर्षांपूर्वी जवळच्या लोकांनीच दूर केलं… हमाली करणाऱ्या वडिलांचे २००६ मध्ये अपघातात निधन, तर तीन वर्षांपूर्वी आईलाही हृदयविकाराच्या झटक्याने गमावलं…अवघ्या ८ वीपर्यंत शिक्षण झालेल्या आणि रिक्षा चालवून पोट भरणाऱ्या तरुणाच्या आयुष्यात दुःखाचे डोंगर कमी नव्हते. मात्र, याच जावेद यांच्या घरात जेव्हा एक गोंडस परी जन्माला आली, तेव्हा त्यांनी आपल्या पत्र्याच्या घराचा थेट सोन्याचा महाल करून तिचे स्वागत केले. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमागे एका बापाचे आपल्या मृत आईवरील अथांग प्रेम आणि एका मानलेल्या बहिणीची मोठी साथ दडलेली आहे.
शेख जावेद रफिक (वय ३०, रा. सेवक नगर, परभणी) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. जावेद यांचा वर्षभरापूर्वी शेख आलिया फातिमा यांच्याशी विवाह झाला. पत्नी गरोदर असतानाच जावेद यांनी मनात एक स्वप्न बाळगलं होतं की, घरात मुलगीच जन्माला यावी. यामागचं भावुक कारण सांगताना जावेद म्हणाले, “माझं माझ्या आईवर खूप-खूप प्रेम होतं. ती अचानक सोडून गेली. मला मुलगीच व्हावी अशी माझी तीव्र इच्छा होती, कारण मला माझ्या मुलीमध्ये माझ्या मृत आईचं रूप बघायचं आहे.”
मानलेल्या बहिणीने दिली साथ अन् झोपडी सजली
दोन वर्षांपूर्वी जेव्हा जवळच्या नातेवाईकांनी जावेद यांना एकटं पाडलं, तेव्हा रेखा सुभाष शिर्के या त्यांना भाऊ मानून पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. रेखा शिर्के यांनीच पुढाकार घेऊन जावेद यांचं लग्न जमवून दिलं होतं. जावेद जेव्हा दवाखान्यात पत्नी आणि बाळाला आणायला गेले, तेव्हा या मानलेल्या बहिणीनेच (रेखा शिर्के) जावेद यांना घर सजवण्यासाठी मोलाची मदत केली. घरात निळ्या-गुलाबी फुलांची सजावट, फुगे आणि कॉटवर ताज्या गुलाबाच्या पाकळ्यांचा सडा पसरवून “Welcome It’s My Baby Girl” असा बोर्ड लावून त्यांनी घराचे रूपच बदलून टाकले.
घरच्या तयारीने पत्नी भारावली
जावेद यांची पत्नी आलिया म्हणाल्या, आम्हाला मुलगीच हवी होती. मुलगा असो की मुलगी, आम्ही कधीच भेदभाव करत नाही. मी दवाखान्यात असताना पतीने घरी एवढी मोठी तयारी केली असेल याची मला कल्पनाच नव्हती. जेव्हा मी बाळाला घेऊन घरी आले, तेव्हा मला आनंदाचा मोठा धक्का बसला. स्त्रीभ्रूण हत्या आणि मुलगाच हवा या हट्टामुळे अनेक ठिकाणी मुलींना जन्माआधीच मारले जाते किंवा जन्मल्यावर रस्त्यावर फेकून दिले जाते. अशा भीषण वास्तवात परभणीतील या ८ वी पास रिक्षाचालकाने दाखवलेले हे प्रेम समाजाला मोठा संदेश देऊन जात आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा