Chhatrapati Sambhajinagar Khavdya Mountain Accident Pallavi Jarhad : छत्रपती संभाजीनगरमधील तिसगाव येथील खवड्या डोंगर येथे झालेल्या दुर्घटनेत रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. आता या प्रकरणात मयत कुणालची मावशी पल्लवी जऱ्हाड यांनी उडी घेतली आहे.
संभाजीनगर दुर्घटना मावशी पल्लवी जऱ्हाड प्रतिक्रिया(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील शहरातील तिसगाव परिसरातील खवड्या डोंगर तिहेरी मृत्यू प्रकरणात आता कौटुंबिक वादाचा अत्यंत गंभीर आणि खळबळजनक अँगल समोर आला आहे. मयत मुरलीधर चांदगुडे यांच्या आईने मयत संगीता चांदगुडे यांच्यावर ‘तिने माझ्या मुलाला 20 वर्षांपासून आमच्यापासून दूर ठेवलं’, असा आरोप केला होता. या आरोपांना आता संगीता यांची बहीण आणि कुणालची मावशी पल्लवी जऱ्हाड यांनी अत्यंत आक्रमक आणि उद्विग्न सवाल उपस्थित करत थेट प्रत्युत्तर दिलं आहे.
‘डोक्यात फावडं का टाकलं होतं?’
मुरलीधर यांच्या आईच्या दाव्याचा समाचार घेताना पल्लवी जऱ्हाड यांनी जुन्या कौटुंबिक वादावर बोट ठेवलं. त्या म्हणाल्या की, ‘मुरलीधरला 20 वर्षांपासून दूर ठेवल्याचा दावा करणाऱ्यांनी आधी एका प्रश्नाचं उत्तर द्यावं. 20 वर्षांपूर्वी मुलाने गाव आणि शेत सोडून जावे म्हणून त्याच्या डोक्यात फावडं का टाकलं होतं? त्यावेळी तुमचा मुलगा जगेल की मरेल, याचा विचार तुम्ही केला नव्हता का?, असा थेट आणि तिखट सवाल उपस्थित करत त्यांनी सासरच्या मंडळींच्या दाव्यांमधील हवा काढून घेतली.
‘या संपूर्ण दुर्दैवीघटनेमागची खरी पार्श्वभूमी आणि सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही योग्य वेळ आल्यावर देऊ’, असा इशारा देत पल्लवी जऱ्हाड यांनी सध्या शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. ‘आमचं संपूर्ण कुटुंब या आघातातून जात आहे. आम्हाला या अथांग दुःखातून सावरण्यासाठी कृपया थोडा वेळ द्या’, अशी भावनिक आणि कळकळीची विनंती त्यांनी केली. खवड्या डोंगरावर घडलेल्या या दुर्दैवी दुर्घटनेनंतर सुरुवातीला आयफोन, नंतर कौटुंबिक अढी आणि आता सासर-माहेरच्या जुन्या वैमनस्याचे गंभीर आरोप समोर येत आहेत. या नवीन आरोप-प्रत्यारोपांमुळे पोलीस तपासासोबतच या दुर्घटनेमागचे कौटुंबिक वादाचे पदर आणखी गडद झाले आहेत.
‘आमचं सर्वकाही संपलं, आता आमचा वंश चालवण्यासाठी कोणीही शिल्लक राहिलेलं नाही. काय करावं हेच सुचत नाही. कुणाचाही आधार राहिला नाही’, असं सांगताना मयत मुरलीधर चांदगुडे यांचे वृद्ध वडील दामोदरराव चांदगुडे यांच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नाहीयत. तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावरून दरीत उडी घेऊन चांदगुडे कुटुंबातील तिघांनी केलेल्या सामूहिक आत्महत्येच्या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण जिल्हा सुन्न झाला आहे. मुलगा, सून आणि 19 वर्षांचा नातू अशा तीन छत्रछाया एकाच वेळी हरपल्याने 75 वर्षांच्या वृद्धाचा आक्रोश उपस्थितांचं काळीज पिळवटून टाकणारा होता.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा