Headlines

Chhatrapati Sambhajinagar Khavdya Mountain Accident Murlidhar Chandgude Father Reaction; ‘आमचं सर्व संपलं, आता वंशच नाही’; वृद्ध बापाचा काळीज चिरणारा आक्रोश, म्हातारपणी होतकरु लेकराला खांदा, उपस्थितांचाही कंठ दाटला


Chhatrapati Sambhajinagar Khavdya Mountain Accident Murlidhar Chandgude Father Reaction : तिसगाव खवड्या डोंगर प्रकरणात मुरलीधर चांदगुडे यांचे वृद्ध वडील यांचा आक्रोश अक्षरश: काळीज पिळवटून टाकतोय.

Chhatrapati Sambhajinagar Khavdya Mountain Accident Sangita Chandgude Father Reaction
खवड्या डोंगर उडी मारल्याचा व्हिडिओ(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : ‘आमचं सर्वकाही संपलं, आता आमचा वंश चालवण्यासाठी कोणीही शिल्लक राहिलेलं नाही. काय करावं हेच सुचत नाही. कुणाचाही आधार राहिला नाही’, असं सांगताना दामोदरराव चांदगुडे यांच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नाहीयत. तिसगा परिसरातील खवड्या डोंगरावरून दरीत उडी घेऊन चांदगुडे कुटुंबातील तिघांनी केलेल्या सामूहिक आत्महत्येच्या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण जिल्हा सुन्न झाला आहे. मुलगा, सून आणि 19 वर्षांचा नातू अशा तीन छत्रछाया एकाच वेळी हरपल्याने 75 वर्षांच्या वृद्धाचा आक्रोश उपस्थितांचं काळीज पिळवटून टाकणारा होता.

‘आमचं सर्वकाही संपलं…’

​मुरलीधर चांदगुडे यांचे वृद्ध वडील दामोदरराव चांदगुडे यांनी या घटनेनंतर धाय मोकलून रडत आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘आमचं सर्वकाही संपलं…आता आमचा वंश चालवण्यासाठी कोणीही शिल्लक राहिलेलं नाही. काय करावं हेच सुचत नाही. कुणाचाही आधार राहिला नाही’, असं सांगताना दामोदरराव यांच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नाहीयत.​ दामोदरराव यांनी या दुर्दैवी घटनेमागील कौटुंबिक दुराव्याचं जुनं कारणही उघड केलं.

Maharashtra TimesKhavdya Dongar : ‘आयफोनचा काहीही संबंध नाही, कुणालला असं करायचंच नव्हतं’; वादामागचं जुनं कारण समोर, आजोबांनी सांगितली धक्कादायक वस्तुस्थिती

‘गुप्त लग्नामुळे आमची त्याच्यावर नाराजी’

20 ते 22 वर्षांपूर्वी मुरलीधर रोजगाराच्या शोधात छत्रपती संभाजीनगर येथे आले होते. तिथे चालकाची नोकरी करताना त्यांनी संगीता यांच्याशी विवाह केला; मात्र या विवाहाची कोणतीही माहिती त्यांनी गावी दिली नव्हती. ‘त्यानं लग्न केलं हे आम्हाला माहीतच नव्हतं. या गुप्त लग्नामुळे आमची त्याच्यावर नाराजी होती आणि आम्ही लग्नालाही उपस्थित नव्हतो. त्यामुळे तो आमच्याशी फारसा बोलायचा नाही. मुरलीधर, त्याची पत्नी संगीता आणि मुलगा कुणाल हे तिघेही गावी आले तरी आमच्याशी कधीही एका शब्दाने बोलत नव्हते,’ अशी मोठी खंत दामोदरराव यांनी यावेळी व्यक्त केली.

​जमिनीचा हिस्सा दिला, पण नाती जोडली गेली नाही

​दामोदरराव यांनी आपली तीन एकर जमीन मुलगा मुरलीधरच्या नावावर केली होती. तर काही भाग मुलींना दिला होता. मुरलीधर ही जमीन बटाई किंवा ठोक्याने देऊन शेती करायचे. दोन-तीन महिन्यांपूर्वी बहिणीने मुलाच्या लग्नाची पत्रिका दिल्यानंतर मुरलीधर मामा म्हणून लग्नाला आले होते आणि तेव्हाच तेवढ्यापुरता त्यांचा घरच्यांशी संवाद झाला होता.

Maharashtra TimesMumbai News : ‘भुलेश्वरचा राजा’ दुर्घटना प्रकरणात नवीन माहिती समोर, कशामुळे बाप्पाची मूर्ती कोसळली? पोलिसांच्या तपासात खरं कारण समोर

आयफोन हे कारणच नाही; खरा वाद आत्याशी बोलण्याचा

सोशल मीडियावर आयफोन न मिळाल्यानं कुणालनं हे पाऊल उचललं, असा दावा केला जात होता. यावर बोलताना कुणालचे आजोबा म्हणजेच संगीता चांदगुडे यांचे वडील बबनराव पाटील म्हणाले, ‘आयफोनमुळे हे घडलं हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. कुणालकडे आधीपासूनच आयफोन होता. गेल्या महिना-दीड महिन्यापासून बाप-मुलामध्ये वाद सुरू होता, पण त्यांच्यात एकमेकांवर जितका राग होता, तितकाच प्रचंड जीवही होता’, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा