Reva Kaurase : ‘बिग बॉस मराठी ६’ फेम रेवा कौरासेनं कास्टिंग काउचचा धक्कादायक प्रकार सांगितला आहे. या प्रकारामुळे ती खूप खचली होती, असं रेवानं सांगितलं.

रेवानं सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव
रेवानं सांगितलं की, तिला हैदराबादला बोलावण्यात आलं होतं. तिथं तिनं तीन दिवस लुक टेस्ट, कॅमेरा टेस्ट आणि वर्कशॉप केले. रेवा म्हणाली, ‘सर्व काही पूर्णपणे प्रोफेशनल वाटत होतं. मला खात्री होती की, मला चित्रपट मिळाला आहे. मला साइनिंग अमाऊंटसुद्धा देण्यात आली होती आणि शुभ दिवशी करारावर सही केली जाईल असंही सांगण्यात आलं होतं.’
Kamlesh Sawant : ‘माझे ७० लाख बुडाले आहेत’, मराठी अभिनेते कमलेश सावंत यांचा दावा, सांगितला किस्सा
रेवानं सांगितलं की, काही काळानंतर निर्मात्यांनी तिच्याशी बोलणं बंद केलं. जेव्हा तिनं त्यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा तिला अप्रत्यक्षपणे सांगण्यात आलं की, चित्रपटाच्या एका निर्मात्याला तिच्याकडून वैयक्तिक गोष्टींची अपेक्षा आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘मला धक्का बसला. त्यावेळी माझी करिअर नुकतंच सुरू झालेलं. कोणी असं काही बोलू शकतं यावर माझा विश्वासच बसत नव्हता.’
Geeta Kapoor : पोटच्या लेकाकडून छळ, जेवणाचेही केले हाल, घर विकून पसार; मुलाच्या आठवणीत सुप्रसिद्ध अभिनेत्री झालेली बेहाल, अखेर दुर्दैवी अंत
अभिनेत्री म्हणाली, ‘जर हीच अट होती, तर तुम्ही मला सुरुवातीलाच सांगायला हवं होतं. माझा वेळ का वाया घालवत आहात? मी त्याच क्षणी ठरवलं की, मला हा चित्रपट करायचा नाही. मी त्या व्यक्तीशी पुन्हा कधीच बोलले नाही.’
स्वखर्चाने अभिनेत्री पुण्याला आली
चित्रपट सोडल्यानंतर परिस्थिती इतकी बिकट झाली की, निर्मात्यांनी रेवासाठी परतीचं तिकीटही बुक केलं नाही. रेवा म्हणाली, ‘मी माझ्या स्वतःच्या पैशाने तिकीट काढलं आणि पुण्याला परत आले. मी इतकी खचले होते की, काय घडलं हे मी माझ्या कुटुंबालाही सांगू शकले नाही.’ या घटनेचा रेवावर खूप खोलवर परिणाम झाला. रेवा म्हणाली, ‘जवळपास दोन महिने मी कशावरही लक्ष केंद्रित करू शकले नाही. मी माझ्या मित्रांना आणि कुटुंबीयांना आधीच सांगितलं होतं की, मला एक मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे. पण अचानक रिकाम्या हातानं परत येणं तिच्यासाठी खूप कठीण होतं.’
माझ्या नवऱ्याची बायकोतील अभिजीतच्या भूमिकेमुळे टोमणे, Sukhada Khandkekar ने उलगडले धमाल किस्से
रेवा म्हणाली की, तिनं तिच्या बहिणीला सर्व काही सांगितलं, त्यानंतर ती हळूहळू या घटनेतून सावरली. या घटनेनं तिला खूप काही शिकवला. आता, कोणताही प्रोजेक्ट निवडण्यापूर्वी ती अत्यंत सावधगिरी बाळगते. रेवा म्हणाली, ‘या घटनेनंतर मी अनेक चांगल्या दिग्दर्शकांसोबत आणि प्रोडक्शन हाऊससोबत काम केलं आहे. त्यामुळे, मी एका घटनेच्या आधारावर संपूर्ण इंडस्ट्रीवर टीका करू शकत नाही.’ ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये रेवानं घडलेला प्रकार सांगितला आहे.
दरम्यान, रेवा कौरासेच्या कामाबद्दल सांगायचं तर तिनं काही मालिकांमध्ये काम केलं आहे. त्याचबरोबर बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात अभिनेत्री सहभागी झाली होती.

