Daughter’s Property Rights in India: आजही अनेकांना प्रश्न पडतो की मुलींचा वडिलांच्या तसेच वडिलोपार्जित मालमत्तेवर काही हक्क असतो का?कायदेशीररित्या मुलींना वडिलांच्या मालमत्तेवर त्यांच्या भावांप्रमाणेच समान हक्क दिले गेले आहेत, पण वडिलांनी आपल्या मर्जीने मुलीचा हक्क मुलाला दिला तर काय? अशा प्रकरणात कायदा नेमकं काय सांगतो.

वडील मुलीचा हक्क मुलाला देऊ शकतात का?
आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने अलिकडच्या एका निकालात म्हटले आहे की, वडिलोपार्जित मालमत्तेच्या बाबतीत प्रत्येक सहवारस किंवा सह-हिस्सेदार, जसे की मुलगे आणि मुली, यांचा मालमत्तेत स्वतंत्र आणि निहित अधिकार असतो.
Property Rights: नातेवाईक, भाऊ-बहीण जमीन वाटपास तयार नाही; खरच संमतीशिवाय जमिनीतला हिस्सा तुम्हाला मिळतो का?
त्यामुळे, वडिलांनी मुलीला वगळून केवळ मुलाच्या नावावर हक्कसोडपत्र किंवा relinquishment डीड केले तर, ते केवळ वडिलांनी स्वतःच्या कमाईतून घेतलेल्या मालमत्ता किंवा संपत्तीवर लागू होईल आणि मुलींसारख्या इतर सहहिस्सेदारांच्या हक्कांवर परिणाम होणार नाही. लक्षात घ्या की जेव्हा एखाद्या व्यक्तीला एखादी संपत्ती किंवा मालमत्तेवरील हक्क सोडायचे असतात तेव्हा हक्कत्याग केले जाते.
प्रकरण नेमकं काय?
वडिलांनी कथितरित्या आपल्या मृत पहिल्या पत्नीपासून मिळेलेली वडिलोपार्जित मालमत्ता केवळ आपल्या मुलाच्या नावे करणारे हक्कसोड पत्र तयार केले आणि आपल्या दुसऱ्या लग्नापासून झालेल्या मुलींना वगळले. प्रकरण कोर्टात गेल्यास वडील असं करू शकत नाही आणि मुली वडिलोपार्जित मालमत्तेतील त्यांच्या योग्य वाट्यासाठी पात्र आहे, असा उच्च न्यायालयाने निकाल दिला.
सोसायटी मेंटेनन्स थकबाकीवर 12% दंड, सुलभ स्वयं-पुनर्विकास; सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या कामकाजात होणारे बदल समजून घ्या
आंध्र प्रदेश कोर्टाने सांगितले की, कायदेशीररित्या कोणतीही व्यक्ती दुसऱ्या सह-मालकाचे हक्क हिरावून घेऊ शकत नाही, हस्तांतरित करू शकत नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही आणि केवळ आपल्या हक्काचा वाटाच व्यवस्थापित करू शकते. परिणामी, कथित relinquishment deed मान्य झाले तरीही मुलींच्या वडिलोपार्जित मालमत्तेतील वाटणीचा दावा आणि आपापल्या वाट्यावर दावा करण्याचा अधिकार नाकारू शकत नाही.
वडिलोपार्जित संपत्तीवर कोणाचा अधिकार?
समजा आजोबा, वडील, मुलगा आणि मुलगी यांची संयुक्त वडिलोपार्जित शेतजमीन आहे. या जमिनीची वाटणी होईपर्यंत कोणीही विशिष्ट एकर जागेवर दावा करू शकत नाही आणि संपूर्ण जमिनीवर सर्वांचे सामूहिक हक्क असतात.
SK Hynix Listing: AI क्षेत्रात मोठा बूम! कधीही न मिळणारी ‘जॅकपॉट’ संधी, अनोळखी कोरियन चिपमेकर कंपनी करणार 2800 कोटींचा श्रीगणेशा
त्याचप्रमाणे, एखाद्याने स्वतःच्या कमाईतून पूर्णपणे एखादी मालमत्ता खरेदी केली आणि केवळ स्वतःच्या मालकीची ठेवली, म्हणजे इतरांना त्यात कोणताही हिस्सा दिला नाही तर, त्या मालमत्तेवर मुलगा किंवा मुलीला आपोआप जन्मासिद्ध अधिकार मिळत नाही. अशा मालमत्तेवर वडिलांसोबत मुलांचा संयुक्त ताबा नसतो. त्यामुळे, स्वतःच्या कमाईतून मिळवलेली मालमत्ता coparcenary property मानली जात नाही.

