Headlines

Omraje Nimbalkar meets Eknath Shinde 8 demands of Dharashiv Lok Sabha after joining Shiv Sena; शिवसेना प्रवेशानंतर खा. ओमराजे निंबाळकर अ‍ॅक्शन मोडमध्ये, एकनाथ शिंदेंकडे मोठ्या मागण्या


Maharashtra Politics : सहा फुटीर खासदारांपैकी एक धाराशिवचे लोकप्रतिनिधी ओम राजेनिंबाळकर यांनी नुकतीच एकनाथ शिंदेंची भेट घेतली.

Omraje Nimbalkar Eknath Shinde Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची साथ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत सहभागी झालेल्या सहा फुटीर खासदारांपैकी एक धाराशिवचे लोकप्रतिनिधी ओम राजेनिंबाळकर यांनी नुकतीच पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. या भेटीत मतदारसंघातील आठ प्रमुख मागण्या ठेवल्याची माहिती ओमराजेंनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.

मुंबई येथील नंदनवन येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेऊन धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न तसेच जनहिताच्या मागण्यांचे निवेदन सादर केले, असे ओमराजेंनी सोशल मीडियावर लिहिले आहे. यावेळी शेतकरी, पाणी, सिंचन, वीज, उद्योग आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
Maharashtra TimesEknath Khadse : महाजनांचा प्रभाव घटवण्यासाठी केंद्राची नवी चाल? तावडेंशी भेट, घरवापसीच्या चर्चांवर एकनाथ खडसे म्हणतात…

एकनाथ शिंदेंकडे ओमराजेंच्या आठ प्रमुख मागण्या

१. टाटा इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून CSR निधी तसेच राज्य सरकारच्या सहकार्याने धाराशिव लोकसभा मतदारसंघात आधुनिक स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्यात यावे, जेणेकरून स्थानिक युवक-युवतींना उद्योगाभिमुख प्रशिक्षण मिळून मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे ओमराजे म्हणाले.
२. कृष्णा–मराठवाडा सिंचन प्रकल्पास राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा देऊन आवश्यक निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी.
३. सात टीएमसी पाण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करून प्रकल्पाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावीत.
४. पीक विम्यातून वगळलेले ट्रिगर पुन्हा लागू करून शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ मिळावा, यासाठी विमा कंपनीच्या निकषांमध्ये आवश्यक बदल करण्यात यावेत, अशी महत्त्वाची मागणी ओमराजे यांनी केली.

शिंदेसेनेकडून ऑफर, ठाकरेंच्या नगरसेवकांनी ताकद दाखवली, नाशिकमध्ये घडामोडींना वेग

५. महावितरण कार्यालयाचे विभाजन करून वैराग येथे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरु करण्यात यावे.
६. शेतजमीन खरवडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नसल्यामुळे त्यांना तातडीने आर्थिक मदत वितरित करण्यात यावी.
७. मांजरा आणि तेरणा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे रूपांतर बॅरेजेसमध्ये करून जलसाठा वाढवण्याची योजना राबवण्यात यावी.
८. कौडगाव एमआयडीसीमध्ये लॉजिस्टिक पार्कची स्थापना करुन परिसरातील औद्योगिक विकासाला चालना देण्यात यावी, अशी मागणी.
Maharashtra TimesBus hold for Shev Puri : इच्छा माझी ‘पुरी’ करा! बेस्ट चालकाने शेवपुरीसाठी बस रस्त्यात 20 मिनिटं थांबवली, मुलुंडमध्ये वाहतुकीचे तीनतेरा

याशिवाय, श्री तुळजाभवानी मंदिरातील पुजारी आणि मंदिर प्रशासन यांच्यात अधिक प्रभावी समन्वय साधून राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना सुलभ, सुरळीत व जलद दर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आल्याचे ओमराजेंनी सांगितले.
धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या हिताचे प्रश्न मार्गी लागावेत, शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती यावेळी करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा