चेन्नई: तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता जयम रवी ( रवी मोहन ) आणि त्याची पत्नी आरती यांच्यातील घटस्फोटाचं प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. आरतीनं न्यायालयात दरमहा ४० लाख रुपये पोटगीची मागणी केल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर जोरदार टीका झाली होती. मात्र, आता या वादावर आरतीची आई आणि प्रसिद्ध निर्मात्या सुजाता विजयकुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठे खुलासे केले आहेत.
रवी मोहनने कुटुंबाला मोठ्या कर्जात ढकललं असून बँकेनेंआम्हाला जप्तीची नोटीस बजावली आहे,असा गंभीर आरोप सुजाता यांनी केला आहे.
४० लाखांची मागणी स्वतःसाठी नाही ;आरतीच्या आईचा खुलासा
पत्रकार परिषदेत बोलताना सुजाता विजयकुमार भावूक झाल्या आणि म्हणाल्या, आरतीनं स्वतःच्या वैयक्तिक खर्चासाठी दरमहा ४० लाख रुपयांची मागणी केलेली नाही. रवीनं निर्माण केलेल्या प्रचंड कर्जामुळं आमची कौटुंबिक आणि आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. बँकेनं घरासाठी जप्तीची नोटीस पाठवली आहे. मुलांच्या शाळेची फी, शिकवणी आणि दैनंदिन अन्नासाठीही पैसे उरलेले नाहीत.
त्यांनी पुढे माहिती दिली की, दोन मुलांचे वार्षिक शालेय शुल्क ८६ लाख रुपये आहे. रवीनंच मुलांना अमेरिकन शाळेत प्रवेश दिला होता. याशिवाय, मुलांचे अवांतर उपक्रम आणि कर्जाचे हफ्ते भागवण्यासाठी ही रक्कम मागण्यात आली होती.
कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय काय?
चेन्नई इथल्या कौटुंबिक न्यायालयानं आरतीची दरमहा ४० लाख रुपयांची अंतरिम पोटगीची मागणी फेटाळून लावली आहे. न्यायालयानं रवी मोहनला घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आरतीला दरमहा ३ लाख रुपये आणि दोन्ही मुलांना प्रत्येकी १ लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच, मुलांना वडिलांना भेटण्यापासून रोखलं जाऊ नये, असंही कोर्टानं स्पष्ट केलं आहे.
आरतीच्या आईच्या आरोपांनंतर अभिनेता रवी मोहनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे. त्यानं लिहिलं की,काही लोक न्यायालयाचा अवमान होईल अशा प्रकारे वर्तन करत आहेत, हे दुर्दैवी आहे. मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की,मी जिवंत असेपर्यंत आम्ही चौघे (कुटुंब) पुन्हा एकाच छताखाली एकत्र येऊ शकत नाही.
२००९ मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या रवी आणि आरती यांनी सप्टेंबर २०२४ मध्ये वेगळे होत असल्याची घोषणा केली होती. मात्र, आरतीनं रवीनं तिच्याशी चर्चा न करता परस्पर घटस्फोटाची घोषणा केल्याचा दावा केला होता. सध्या या प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी सुरू असून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत या नाट्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा