Headlines

Ravi Kishan : ‘पैसा आपोआप आपल्या मागे येतो’ म्हणणाऱ्या रवी किशन यांचा युटर्न, म्हणाले, ‘पैशांपेक्षा प्रतिष्ठा जास्त मौल्यवान’


Ravi Kishan : काही दिवसांपासून रवी किशन चर्चेत असून सध्या त्यांचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. अशातच आता यावर रवी किशन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Ravi Kishan On Money
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – लोकप्रिय अभिनेते आणि भाजप खासदार रवी किशन सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. आता त्यांचा एक पॉडकास्ट व्हिडिओदेखील व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रवी किशन यांनी ओळख आणि पैसा यांपैकी कशाला प्राधान्य द्यायचं, हे सांगितलेलं. मात्र, त्यांचं उत्तर इतकं वेगळं होतं की, सोशल मीडियावर लगेचच चर्चेचा विषय बनला. त्यांच्या या वक्तव्यामुळं अनेक मीम्स तयार झाले आहेत आणि युझर्स त्यावर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत.

राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये रवी किशन यांना विचारण्यात आलं की, त्यांच्यासाठी ओळख महत्वाची की पैसा? तेव्हा रवी किशन यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. एक क्षणही न घालवता ते लगेच म्हणाले की, ‘ओळख… पैसा आपोआप आपल्यामागे येतो.’ रवी किशन यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालं.

Maharashtra TimesMaharashtrachi Hasyajatra Fame Viraj Jagtap : बालनाट्यापासून सुरुवात, अभिनयात करिअर करण्याचं स्वप्न उराशी पण आर्थिक तंगी, हास्यजत्रेनं पालटलं नशीब; डोळे पाणावणारा विराज जगतापचा संघर्ष

व्हायरल मीम्सवर रवी किशन यांची प्रतिक्रिया

रवी किशन हे भारतीय जनता पक्षाचे खासदार असून त्यांचा व्हायरल व्हिडिओ पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला. तो विशेषतः तरुण प्रेक्षक आणि सर्वसामान्य जनतेला उद्देशून होता. रवी किशन यांनीही तो व्हिडिओ पुन्हा पोस्ट केला आणि लिहिलं की, ‘पैशांपेक्षा प्रतिष्ठा अधिक मौल्यवान आहे. प्रतिष्ठा आणि पैसा एकमेकांशी जोडलेले आहेत. प्रतिष्ठाच सर्वश्रेष्ठ आहे.’

रवी किशन यांचं वक्तव्य किंवा व्हिडिओ व्हायरल होण्याची ही पहिली वेळ नाही. ते अनेकदा त्यांच्या अनोख्या शैलीमुळे ट्रेंड होतात. अलीकडेच, त्यांच्या ‘मा बहन’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात माध्यमांनी रवी किशन यांना त्यांच्या व्हायरल व्हिडिओबद्दल विचारलं असता रवी किशन म्हणाले की, ‘मी महादेवाची शपथ घेऊन सांगतो, मला समजत नाही की मी प्रत्येक वेळी कसा आणि का व्हायरल होतो.’

Kshama Deshpande : सावित्रीबाई फुलेंची भूमिका मॅनिफेस्ट केलेली, अमोल कोल्हेंचा फोन, क्षमाची निवड

राजकारण आणि सोशल मीडिया ट्रेंड्सच्या दरम्यान, रवी किशन आपल्या अभिनय क्षेत्रातही खूप व्यग्र आहेत. त्यांच्या ‘आर्यभट्ट का झिरो’ या सिनेमाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट ७ ऑगस्ट २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. पण, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत नाहीये. रवी किशन लवकरच ‘खोसला का घोसला २’ मध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट २००६ च्या सुपरहिट कॉमेडी ‘खोसला का घोसला’ चा सिक्वेल असून, यात कथेचा पुढील भाग असेल. या चित्रपटात अनुपम खेर, बोमन इराणी, प्रवीण डबास, रणवीर शौरी, किरण जुनेजा आणि तारा शर्मा यांच्याही भूमिका आहेत.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा