Headlines

Ratnagiri Dahivali Landslide Accident Vilas Shelar Saved Lives Two People Father and Son Died; चुलत्यांचं घर दिसेनासं, धोका दिसताच नातेवाईकांना बाहेर काढलं, स्वत: 20 फूट खाली उडी मारली; रत्नागिरीतील ‘ती’ व्यक्ती ठरली देवदूत


Ratnagiri Dahivali Landslide Incident Vijay Shelar : रत्नागिरीतील खेड तालुक्यामधील दहिवली येथे दरड कोसळून वडील आणि मुलाचा करुण अंत झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Ratnagiri Dahivali Landslide Incident Vijay Shelar
दहिवली विलास शेलार दोनजणांना वाचवलं(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणात पावसाने हाहा:कार उडवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात विशेषतः खेड तालुक्यात आपत्तींची मालिकाच सुरू आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय मार्गावर रविवारी 5 जुलै रोजी मध्यरात्री उशिरा खवटी येथे डोंगर कोसळून अवघा महामार्ग ठप्प झाला. या घटनेला 24 तास उलटत नाही तोवर खेड तालुक्यातील दहिवली येथे सोमवारी 6 जुलै रोजी रात्री दरड कोसळून तब्बल 4 घरे दरडीखाली दबली गेली. या दुर्घटनेत वडील आणि मुलाचा करुण अंत झाला असून सुदैवाने या दुर्घटनेत आई बचावली आहे.

मोठ्या दुर्घटनेचे पहिले साक्षीदार

हा सगळा प्रकार ज्यांच्यामुळे उघडकीस आला ते म्हणजे विजय शेलार. प्रसंगावधान राखत त्यांनी आणखी दोघांना घरातून बाहेर काढल्यानं दोघांचा जीव वाचवला. त्यांनी स्वतःचा देखील 20 फूट खाली उडी मारून जीव वाचवला. त्या विजय शेलार यांची कामगिरी धाडसी ठरली आहे. अन्यथा आणखी मोठा अनर्थ घडला असता. शेलार हे एका दिवसासाठी मुंबईहून गावी आलेले होते. ते या मोठ्या दुर्घटनेचे पहिले साक्षीदार ठरले असून त्यांच्यामुळेच या सगळ्या भयंकर दुर्घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थ व प्रशासनापर्यंत पोहोचली व तात्काळ मदतकार्य सुरू झालं. त्यामुळे या दुर्घटनेत त्यांनी केलेली कामगिरी जणू देवदूताची ठरली आहे, असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही.
Maharashtra TimesPune News : ताईला सांगत होतो इथे काम नको करुस… बहीण ढिगाऱ्याखाली अडकली, भावाचा हंबरडा; मोशी इमारत दुर्घटनेनंतर उपस्थित हेलावले

कोण आहेत विजय शेलार?

विजय सहदेव शेलार हे मूळचे याच दहिवली गुडूब वाडीतील आहेत. ते आपल्या नोकरी/व्यवसायानिमित्त मुंबई घाटकोपर येथे स्थायिक आहेत. ते घाटकोपर येथे रिक्षाचालक आहेत. मात्र, त्यांनी प्रसंगावधान राखत दाखवलेल्या धाडसाचं कौतुक सर्वत्र होत आहे. विजय शेलार हे खेड तालुक्यातील तळे येथील भावाच्या सासर्‍याचं निधन झालं त्या कार्यासाठी मुंबईहून गावी आले होते. सोमवारी सायंकाळी खेड येथे ट्रेन उशिरा आल्यानं त्यांना गावी दहिवली येथे पोहोचण्यास संध्याकाळी सुमारे साडेसात ते आठ वाजले.

VIDEO | खेडमध्ये दरड कोसळून मृत्यू,दुर्घटनेला जबाबदार कोण?

जेवणासाठी वाट पाहत होते

शेलार मुंबईहून घरी येणार म्हणून कुटुंब त्यांची जेवणासाठी वाट पाहत जागे होते. रात्री जेवणानंतर ते साडेनऊच्या दरम्यान सहज बाहेर आले. त्यावेळी शेजारच्या चुलत्यांची दोन घरं दरडखीला गेल्यामुळे दिसतच नव्हती. हा प्रकार पाहून त्यांचेही पायाखालची जमीन सरकली. पण त्याही परिस्थितीत प्रसंगावधान राखत विजय यांनी शेजारच्या घरात राहणारे केशव शेलार व मुक्ताबाई शेलार या दोघांना तत्काळ बाहेर काढत त्यांचे प्राण वाचवले. याचदरम्यान ज्यांना बाहेर काढलं त्याही घरावर मोठे झाड कोसळलं. पण दैव बलवत्तर म्हणून विजय शेलार यांनी तब्बल 20 फूट खाली उडी मारल्याने ते सुदैवाने स्वतःचा जीवही वाचऊ शकले, अशी माहिती दहिवली येथील राजेंद्र शेलार यांनी दिली.
Maharashtra TimesHingoli Earthquake : हिंगोली, परभणी, नांदेडमध्ये मध्यरात्री भूकंपाचे सौम्य धक्के; दोन तासात चार वेळा धरणीकंपाची पहिलीच वेळ

याआधी शासनाला याची माहिती दिलेली

‘विजय शेलार यांच्यामुळेच हा घडलेला प्रसंग गावातील सरपंच, पोलीस पाटील, महसूल व पोलीस प्रशासन आम्हाला सगळ्यांना कळला अन्यथा ही दुर्घटना आम्हाला कदाचित दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत कळलीच नसती’, अशी प्रतिक्रिया राजेंद्र शेलार यांनी दिली. राजेंद्र शेलार यांचेही घर या दुर्घटनेत घरात पाणी शिरल्याने पूर्णपणे बाधित झालं आहे. ‘गुडुबवाडी व गोलामवाडीत अशी काही आपत्ती दुर्घटना घडण्याची भीती आम्हाला पूर्वीपासून होती. त्यामुळे आपण स्वतः शासनाकडे 2017 पासून पत्र व्यवहारी केले आहेत. आमच्या गावात यापूर्वी जमीनींना भेगा जाण्याचे प्रकार घडले होते. मात्र, त्याकडे शासनाकडून गांभीर्याने पाहिलं गेलं नाही त्यामुळे आज ही परिस्थिती ओढवली’, अशी खंत त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ जवळ बोलताना व्यक्त केली.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा