जागतिक पातळीवर सुरू असलेलं युद्ध, आंतरराष्ट्रीय तणाव आणि सुरक्षेचा प्रश्न यामुळं लहान मुलांमध्येही सुरक्षा निर्माण होत आहे, घरातील लहान मुलंही आता याचा विचार करत असल्याचं बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यानं म्हटलं आहे.
सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांची दोन्ही मुलं तैमूर अली खान आणि जेह अली खान या जागतिक पातळीवर सुरू असलेल्या युद्धाबद्दल प्रश्न विचारतात, असं सैफनं सांगितलं.मुलही आता या सगळ्याचा गंभीरपणे विचार करू लागली आहेत. जगात ठिकठिकाणी सुरू असलेल्या संघर्षांच्या बातम्या ऐकून ही दोन्ही चिमुकली घाबरली असून, देशाच्या सुरक्षेविषयी आणि स्वतःच्या भविष्याबद्दल पालकांना प्रश्न विचारत आहेत, असं तो म्हणाला.
सैनिकांशी संवाद साधताना सैफ अली खानम्हणाला, जगात सुरू असलेल्या वेगवेगळ्या युद्धांच्या बातम्यांमुळं माझी दोन्ही मुलं तैमूर आणि जेह काहीसे घाबरलेले, काळजीत असतात. ते मला घाबरून विचारतात की,’आपली काळजी कोण घेतंय? पुढं काय होणार? परिस्थिती आणखी बिघडणार का?’ लहान मुलं असूनही त्यांच्या मनात जगातील तणावाबद्दल आणि आपल्या देशाच्या सुरक्षेबद्दल भीती निर्माण झाली आहे.
मुलांच्या या प्रश्नांवर त्यांना धीर देताना सैफ त्यांना काय सांगतो, याबद्दल बोलताना तो म्हणाला की, मी माझ्या मुलांना नेहमी सांगतो की, आपल्या देशाची सीमा आणि आपले नागरिक पूर्णपणे सुरक्षित आहेत, कारण आपलं भारतीय लष्करदिवस-रात्र आपलं रक्षण करत आहे. माझ्या मुलांच्या मनातही सैनिकांच्या मनात प्रचंड आदर आहे आणि तुम्हा सर्वांना ते सलाम करतात. आपल्या सैनिकांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
मध्य पूर्वेतील तणाव आणि जागतिक संघर्षांचं सावट सामान्य माणसांप्रमाणेच लहान मुलांच्या संवेदनशील मनावरही कसा प्रभाव पाडत आहे, हे सैफ अली खानच्या या वक्तव्यातून समोर आलं आहे.
उरी दौऱ्यात सैनिकांसोबत घालवला वेळ
उरी भेटीदरम्यान सैफनं सैनिकांसोबत केवळ गप्पाच मारल्या नाहीत, तर त्यांच्यासोबत तो क्रिकेट खेळला, स्वयंपाकघरात अन्न बनवण्यात मदत केली आणि आपल्या लोकप्रिय गाण्यांवर सैनिकांसोबत डान्सही केला.
काश्मीरच्या सौंदर्याचे कौतुक करताना त्यानं इथं अधिक पर्यटनासाठी यावं, अशी इच्छाही व्यक्त केली.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा