‘एज्युकेशनल सिटी, मेडिकल सिटी, स्पोर्ट्स सिटी, डेटा सेंटर, संशोधन संस्था, व्यावसायिक केंद्र, आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, तसेच जागतिक तंत्रज्ञान कंपन्या आणि सेवा उद्योग तिसऱ्या मुंबईत आणले जाणार असतील, तर त्यासाठी रायगडमधील मुला-मुलींना आवश्यक कौशल्य देण्याची तयारी सरकारने केली आहे का? कोकणात आजवर अनेक विकास प्रकल्प आले. मात्र, त्याचा स्थानिकांना किती फायदा झाला आणि कोकणातील किती मुला-मुलींना रोजगार मिळाला, याचा हिशेब सरकारने द्यावा’, अशी मागणी राज यांनी केली.
Kolhapur Politics : मुश्रीफ आणि घाटगे एकत्र; ही युती नाही महायुती, फडणवीसांची टोलेबाजी; दिली फेविकोल जोडाची उपमाशेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्यानंतर ते केवळ माजी जमीनमालक राहणार आणि त्यांच्या डोळ्यांसमोर तिसरी मुंबई उभी राहणार, अशी परिस्थिती निर्माण होऊ नये. ‘तुमच्या पायाखालची जमीन विकली जाणार आणि महाराष्ट्रही असाच विकला जाणार. त्यामुळे स्थानिकांनी या संपूर्ण प्रक्रियेकडे गांभीर्याने पाहून आपल्या जमिनी आणि भविष्यासंदर्भात जागरूक राहावे’, असे आवाहन राज यांनी केले.
Radhakrishna Vikhe Patil : मनोज जरांगे यांची भेट घेणार, आरक्षणाच्या कायदेशीर पेचातून मार्ग काढणार, विखे पाटील यांची भूमिका‘मुंबई-गोवा महामार्गासाठी टक्केवारी’
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरूनही राज ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र डागले. ‘राजकीय हस्तक्षेपामुळे महामार्गाचे काम रखडले आहे. कंत्राटदार काम सोडून गेल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले होते. मात्र, कंत्राटदार कोणामुळे कंटाळले? महामार्गाचे भूसंपादन पूर्ण न करताच कंत्राटे देण्यात आली. सरकारने कंत्राटदाराला पैसे दिले आणि त्यातून ‘टक्केवारी’ घेण्यात आली; मात्र रस्ता तिथेच राहिला. हा रस्ता विकासासाठी नव्हे, तर किती टक्के मिळतील यासाठी केला जात आहे’, असा गंभीर आरोप राज यांनी केला.

