Headlines

Raigad Schoolgirls Viral Report on Bad Road Forces Quick Action | ‘खड्ड्यातलं पाणी सुद्धा हलत नाही’, शाळेतल्या मुलींनी दाखवली रस्त्यांची दुर्दशा, व्हायरल व्हिडीओनं अख्खा महाराष्ट्र हलवला


School Girls Report Bad Road: रायगडमधील कोंदिवडे गावातील दोन शाळकरी मुलींनी खराब रस्त्याचं उपरोधिक शैलीत केलेलं रिपोर्टिंग केलं. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून राज्यभरातील लोकं या मुलींचं कौतुक करत आहेत.

Maharashtra bad roads
(फोटो सौजन्य – @Mahadev_Balgude/x.com)
खराब रस्ते ही देशातील खूप मोठी समस्या आहे. आपल्या महाराष्ट्रातसुद्धा अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथे रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यामध्ये रस्ता, हेच कळत नाही. बरं, या प्रकरणी स्थानिक मंडळी वारंवार आवाज उठवतात. पण परिस्थिती फारशी काही बदलली आहे, असं दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील कोंदिवडे गावातील दोन शाळकरी मुलींचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या मुलींनी आपल्या गावातील खराब रस्त्याचं रिपोर्टिंग केलंय. अन् हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, नेटकरी प्रशासनावर टीका करत आहेत.

काय म्हणाल्या मुली?

हा व्हिडीओ @Mahadev_Balgude आणि @AdvYashomatiINC अशा अनेक सोशल मीडिया हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये शाळेतील दोन मुली आपल्या गावातील रस्त्याची दुर्दशा दाखवत आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे, या मुलींनी उपरोधिक शैलीत रस्त्याचं वर्णन केलंय. त्या म्हणताहेत, हा रस्ता जणू राज्यातील इतर मोठ्या हायवेंसारखा दिसतोय. हा रस्ता इतका भारी आहे की, त्याच्या पोटातील पाणी सुद्धा निघत नाहीये. खड्ड्यामध्ये रस्ता आहे की रस्त्यामध्ये खड्डा, काहीच कळत नाहीये. आणि व्हिडीओच्या शेवटी त्यांनी या खड्डेमय रस्त्याची दृश्यं दाखवली आहेत.

रस्त्यात खड्डा की खड्ड्यामध्ये रस्ता?

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. अन् राज्यभरातील नेटकरी या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये राज्य सरकारवर टीका करत आहेत आणि रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करत आहेत.

रस्त्याचं काम झालं सुरू

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनानं या रस्त्याची गांभीर्यानं दखल घेतली आणि अवघ्या काही तासांत रस्त्याची पुनर्बांधणी केली. @ThorveMahendra या एक्स हँडलवरून रस्त्याचं काम सुरू झाल्याची माहिती देणारे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. हे फोटो पाहून लोकांनी समाधान व्यक्त केलंय आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळालं, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा