Raigad Heavy Rain: पाताळगंगा नदी इशारा पातळीवर वाहत आहे. सखल भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

महाड शहरात गेल्या चार दिवसांत तिसऱ्यांदा पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये चिंता आणि भीतीचे वातावरण आहे. रोहा शहरातदेखील सकाळी दुसऱ्यांदा पाणी शिरले. सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी १३४.१० मिमी पावसाची नोंद झाली असून, १ जुलैपासून आतापर्यंत एकूण १,१२३ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे सावित्री, अंबा आणि कुंडलिका नद्यांनी धोका पातळी ओलांडली.
Moshi Building Collapse: मोशीत मोठी दुर्घटना! कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला; 7 जणांची सुटका, 11 कामगार अजूनही ढिगाऱ्याखालीच
कर्जत तालुक्यातील आंबिवली पाझर तलाव अतिवृष्टीमुळे फुटल्याची घटना घडली. जीवितहानी टळली असली तरी सोलनपाडा, जांभरून आणि जाधवपाडा येथील नागरिकांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. अतिवृष्टीमुळे ५५ ठिकाणी दरडी कोसळल्या, तर ७३ घरांजवळ दरडी आल्याच्या घटना घडल्या. रस्त्यांवरील दरडी हटवून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. आपदा मित्र, स्वयंसेवक, ट्रेकर्स, पोलीस आणि महसूल विभागाच्या संयुक्त मोहिमेतून २०० हून अधिक नागरिक व पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली.
जिल्ह्यातील ४२ रस्ते व पुलांचे नुकसान झाले असून ६८ रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. घाटमार्गावरील वाहतूक आवश्यकतेनुसार बंद ठेवण्यात येत असून रेल्वेसेवा सुरू आहे. महामार्गावर अडकलेल्या प्रवाशांना अन्न व पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले. ५१ घरे पूर्णपणे, ८३८ घरे अंशतः, ७१ गोठे, २०३ दुकाने व हातगाड्या तसेच २९ सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. याशिवाय ३३ जनावरे आणि तब्बल ४, २३६ कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.
Devendra Fadnavis: मला शिव्या द्या, पण महाराष्ट्राला बदनाम करु नका! Missing linkवरुन मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
दूध, भाजीपाला पुरवठा विस्कळीत महाड-मुंबई राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत सुरू झाला असला, तरी आंबेनळी, भोर आणि ताम्हिणी घाट बंद असल्याने दूध व भाजीपाल्याचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. हेटवणे मध्यम प्रकल्प ७१.८० टक्के भरला असून जिल्ह्यातील २८ लघु प्रकल्पांपैकी १९ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

