Headlines

Rahul Gandhi Haldwani FIR: दलित शुद्धीकरण झालं, FIRची मागणी भोवली, SC/ST कोणती FIR दाखल झाली – rahul gandhi fir uttarakhand haldwani ramleela maidan purification row sc st act


Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात उत्तराखंडमधील हल्द्वानी पोलिस ठाण्यात FIR दाखल झाली आहे. कारण आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर झालेला ‘शुद्धीकरण यज्ञ’. 8 ऑगस्ट 2026 रोजी खरगे यांनी हल्द्वानीच्या रामलीला मैदानावर सभा घेतली. त्यानंतर 11 ऑगस्टला काही हिंदू संघटनांनी मैदानाचं पावित्र्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी शुद्धीकरण यज्ञ केला. काँग्रेसने मात्र याला अस्पृश्यता आणि दलितविरोधी कृत्य असल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली. मात्र आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. शुद्धीकरण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या राहुल गांधी यांच्याविरोधातच FIR दाखल झाली आहे. जेपी नड्डा यांनी या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला असताना, उत्तराखंडचे मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्षांनी शुद्धीकरणाचं समर्थन केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. नेमकं शुद्धीकरण का करण्यात आलं, खरगे आणि राहुल गांधी काय म्हणाले आणि राहुल गांधींविरोधातच FIR का दाखल झाली? जाणून घेऊया या व्हिडिओत.#RahulGandhi #RahulGandhiFIR #RahulGandhiNews #Haldwani #HaldwaniNews #HaldwaniPurificationRow #MallikarjunKharge #Kharge #UttarakhandNews #UttarakhandPolitics #BJP #Congress #RSS #SCSTAct #PurificationYajna #Untouchability #DalitIssue #BJPCongressClash #BJPUttarakhand #UttarakhandBJP #UttarakhandCongress #HaldwaniControversyahul Gandhi has been booked by police in Haldwani, Uttarakhand, over the ‘purification yajna’ conducted after Congress president Mallikarjun Kharge’s rally. Congress called the ritual an act of untouchability and anti-Dalit discrimination, while Hindu organisations said it was meant to restore the sanctity of the venue. Now, in a major twist, Rahul Gandhi—who demanded action against those behind the ritual—has himself been booked. So, what exactly happened in Haldwani, and why is this now a political flashpoint between Congress, BJP and RSS?



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत